सोन्याच्या दरांत गेल्या आठवड्यात घसरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १४: मजबूत झालेल्या डॉलरमुळे मागील आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १.२ टक्के घसरणीसह बंद झाले, कारण गुंतवणूकदारांनी जोखीम असलेल्या मालमत्तेकडे मोहरा वळवला व त्यामुळे सेफ हेवन समजल्या जाणार्‍या सोन्यावर दबाव आला. अलीकडच्या आठवड्यांमध्ये अमेरिकेद्वारे नोंदण्यात आलेल्या मजबूत आर्थिक आकड्यांनी डॉलरच्या किंमतीला अन्य चलन धारकांपेक्षा कमी आकर्षक करत ग्रीनबॅकला उंच ठेवले असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

यूएस कन्झ्युमरच्या वाढत्या किंमतींबरोबर नवीन बेरोजगारीसाठी अर्ज करणार्‍या अमेरिकनांच्या संख्येतील घसरणीने जगातील सर्वात मोठ्या अर्थतंत्रातील एका सशक्त लेबर मार्केटकडे संकेत केला. सराफा धातूसाठी नुकसान नियंत्रित राहिले कारण अमेरिकन फेडरल रिझर्व आणि युरोपियन केंद्रीय बँकेच्या उदार भूमिकेसह फुगवट्याच्या संभाव्य चिंतांनी सोन्याच्या किंमतीवर प्रभाव टाकला. यूएस फेडच्या आगामी पॉलिसी मीटिंगवर बाजारांची बारीक नजर असेल. वाढती चलनवाढ समर्थन देणे चालू ठेवू शकते. जागतिक अर्थतंत्रे पुन्हा सुरू झाल्यामुळे गुंतवणूकदार जोखीमयुक्त संपत्तीकडे मोर्चा वळवू शकतात.

कच्चे तेल: गेल्या आठवड्यात डब्ल्यूटीआय क्रूड २.४ टक्क्यांपेक्षा अधिकने वाढले, कारण येत्या काही महिन्यांमध्ये जागतिक तेलात रिव्हाईवल होण्याची शक्यता आणि इराणी तेलाच्या अनपेक्षित वापसीची शक्यता धूसर झाल्याने किंमतींना समर्थन मिळाले. ऊर्जा माहिती प्रशासनाच्या रिपोर्टने तेलाचे लाभ सीमित केले कारण या अहवालात असे म्हटले गेले की, गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या तेल साठ्यात ७ मिलियन बॅरलची वृद्धी झाली तर डिस्टिलेट स्टॉकमध्ये ४.४ मिलियन बॅरलची वृद्धी झाली. यूएस गॅसोलीन इन्व्हेंटरीत झालेल्या वाढीमुळे यूएस क्रूड शेअर्समध्ये महत्त्वपूर्ण घसरण नोंदण्यात आली व त्याने किंमती आटोक्यात राहिल्या.

शिवाय, चीनची कच्च्या तेलाची आयात १४.६ टक्क्यांनी (वार्षिक) कमी झाली आहे, कारण चीनमधल्या रिफायनरींमधील कठोर पर्यावरणीय मानदंडांसह होणार्‍या मेंटेनन्समुळे तेलाचा खप मर्यादित झाला आहे. एका खोट्या रिपोर्टनंतर तेलाच्या किंमतींनी देखील आपला काही लाभ गमावला. या रिपोर्टमध्ये असे म्हणण्यात आले होते की, अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने राष्ट्रीय इराणी तेल कंपनीवरील प्रतिबंध रद्द केले आहेत, ज्यामुळे जागतिक गुंतवणूकदार सतर्क झाले. लसीकरणाच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रमुख अर्थतंत्रांमधील तेजी आगामी दिवसांमध्ये तेलाच्या मागणीस रेटा देऊ शकते.


Back to top button
Don`t copy text!