अमेरिकी डॉलर मजबूत स्थितीत आल्याने सोन्याच्या दरात घसरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०४: अमेरिकेच्या मजबूत आर्थिक आकडेवारीने अमेरिकेच्या चलनाला बळ मिळाले. परिणामी डॉलरचे वर्चस्व असलेल्या धातूंचे आकर्षण कमी झाले असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. कालच्या व्यापारी सत्रात, स्पॉट गोल्डे दर २ टक्क्यांनी घसरले व ते १८७०.६ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. कारण अमेरिकेची दमदार आर्थिक आकडेवारी नोंदवली गेल्याने अमेरिकी चलनालाही बळकटी मिळाली. त्यामुळे डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्याचे आकर्षण कमी झाले.

एडीपी नॅशनल एम्प्लॉयमेंट अहवालात, अमेरिकी खासगी क्षेत्रात महत्त्वपूर्ण वृद्धी दिसून आली तर बेरोजगारीच्या दाव्यांतही घट झाली. तसेच सेवा क्षेत्राचा विस्तार नोंदवला गेला. त्यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेत निरंतर सुधारणा होत असल्याचे संकेत यातून मिळाले. अमेरिकेची आर्थिक आकडेवारी अपेक्षेपेक्षा जास्त चांगली आल्याने गुंतवणूकदारांची बाजारातील जोखिमीची भूक वाढली. परिणामी सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याचे आकर्षण कमी झाले. तरीही शुक्रवारीज जाहीर होणाऱ्या अमेरिकी आर्थिक आकडेवारीवर गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष असेल. कारण नुकत्याच सुधारणेनंतर अमेरिका चलनविषयक धोरण कठोर करण्याची शक्यता आहे.

कच्चे तेल: डब्ल्यूटीआय क्रूडचे दर गुरुवारी बाजार बंद होताना काहीसे ०.०६ टक्क्यांनी कमी होऊन ते ६८.८ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. भारत आणि ब्राझीलमधील कोव्हिड-१९ संक्रमितांच्या वाढत्या संख्येने मागणी वाढीचा आशावाद कमी केला. तसेच अमेरिकी क्रूड साठ्यात घट झाल्याने तेलाच्या दरांबाबत खबरदारी घेतली गेली.

एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, अमेरिकी क्रूड साठ्यात मागील आठवड्यात ५.१ दशलक्ष बॅरलची घट झाली. ही घट २.४ दशलक्ष डॉलर होईल, असा बाजाराचा अंदाज होता. या आठवड्याच्या सुरुवातीला, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज आणि सदस्य राष्ट्रांनी उत्पादन कपात कमी करण्यावर सहमती दर्शवली. कारण येत्या काही महिन्यांत जागतिक मागणी वाढल्याने पुवठ्यातही वाढ होण्याची शक्यता आहे.


Back to top button
Don`t copy text!