स्थैर्य, मुंबई, 16 : सोमवारी अमेरिकी डॉलरचे मूल्य वधारल्यामुळे स्पॉट गोल्डचे दर ०.३० टक्क्यांनी घसरून १७२४.६ डॉलर प्रति औसांवर आले. यामुळे पिवळा धातू विविध देशांतील इतर चलनधारकांसाठी महाग झाला आणि त्याचे मूल्य घसरले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. जागतिक बाजारातील अनिश्चितता वाढल्यामुळे गुंतवणूकदारांनी अमेरिकी डॉलरचा आधार घेतला. हादेखील सुरक्षित मार्ग समजला जातो. ९ जून २०२० रोजी संपलेल्या आठवड्यात गुंतवणुकादारांनी कॉमेक्स गोल्ड आणि सिल्व्हरवरही सावधपणे बेटिंग केली. तथापि, साथीच्या दुसऱ्या संभाव्य लाटेची चिंता कायम असल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर मर्यादा आल्या. तसेच अमेरिकेतील रुग्णांची संख्या हळू हळू वाढत असल्याने किंमतीही स्थिर असल्याचे माल्या यांनी नमूद केले.
स्पॉट सिल्व्हरच्या किंमती काहीशा कमी म्हणजेच ०.०६ टक्क्यांनी खाली आल्या आणि १७.४ डॉलर प्रति औसांवर आल्या. एमसीएक्सवरील किंमती ०.६२ टक्क्यांनी कमी होऊन ४७,३९३ रुपये प्रति किलोवर पोहोचल्या.
कच्च्या तेलाच्या किंमती किंमती २.३७ टक्क्यांनी वधारल्या. त्या ३७.१ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. युएईचे ऊर्जा मंत्र्यांनी घोषणा केली की, ओपेकमधील जे देश उत्पादन निर्मितीत कपात करत नाहीत त्यांना त्यांचे वचन पाळणे अनिवार्य आहे. त्यानंतर तेलाच्या किंमती हळू हळू वाढल्या. चीनच्या काही राज्यांमध्ये नव्याने रुग्ण आढळले. अमेरिकेतही २० लाखांपेक्षा जास्त रुग्णसंख्या झाल्याने कोरोना व्हायरसची भीती कायम आहे. यासोबतच हवाई आणि रस्ते वाहतुकीवरील अनेक देशांतील निर्बंधांमुळे कच्च्या तेलातील किंमती वाढण्यावर मर्यादा आल्याचे माल्या यांनी सांगितले.