डॉलरचे मूल्य वधारल्याने सोन्याच्या दरात घसरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य मुंबई, दि.१६: अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने स्पॉट गोल्डचे दर कमी झाले तर बेस मेटलच्या किंमतींना आधार मिळाला. अमेरिकी डॉलरचे मूल्य वधारल्याने पिवळा धातू व औद्योगिक धातूच्या किंमतीची घसरल्या. सॅली या चक्रिवादळामुळे अमेरिकी आखाती किनारपट्टीला मोठा तडाखा बसला. परिणामी अमेरिकेच्या तेल उत्पादनावर परिणाम झाला. क्रूडच्या घटत्या मागणीमुळे दरावरही नियंत्रण राहिले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. 

सोने: मंगळवारी अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने स्पॉट गोल्ड ०.०४% नी काहीसे घसरले व ते १९५५ डॉलर प्रति औसांवर पोहोचले. ब्रेक्झिट कराराच्या चिंतेमुळे स्पॉटो गोल्डच्या दरांना आणखी आधार मिळाला. युरोपियन संघाने अमेरिकेला इंटरनल मार्के बिल या महिन्याच्या अखेरपर्यंत मागे घेण्याची मागणी केली आहे, कॉमन्स हाऊसमध्ये यावर मतदान होणार आहे.

अमेरिकी काँग्रेस आणि व्हाइटहाऊसमधील वाटाघाटी करणा-यांमध्ये काहीशी नकारात्मक भावना अशल्याने गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्ता असलेल्यया सोन्याकडे वळाले. कमी व्याज दराचे वातवरण आणि आर्थिक सुधारणेची आशा यामुळे सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याकडे गुंतवणूकदार वळाले. अमेरिकी डॉलर मजबूत झाल्यास सोन्याच्या किंमतीही घसरू शकतात.

कच्चे तेल: साथीच्या आजारामुळे वाढलेल्या मागणीच्या चिंतेवर अमेरिकी तेल क्षमतेला वादळाचा बसलेला फटका अधिक लक्षवेधी ठरला त्यामुळे कच्चे तेल २.७४% नी वाढले व ते ३८.३ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. सॅली या चक्रिवादळामुळे अमेरिकी किनारपट्टीवरील तेल क्षमता एक पंचमांशापेक्षा जास्त घटली.

कमांडर खलिफा हफतार यांनी अनेक महिन्यांच्या लॉकडाऊननंतर तेल सुविधांचे आदेश दिले, त्यानंतर तेलाचे दर घटले. लिबियन तेल उत्पादन सुरू झाल्यास जागतिक तेल बाजारात दररोज लाखो बॅरलचे उत्पादन जोडले जाईल, असे म्हणतात. ओपेकच्या सदस्यांची १७ सप्टेंबर रोजी जागतिक तेल बाजाराच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठीची बैठक होईल. त्यात २०२० मध्ये जागतिक तेलाची मगाणी ९.४६ दशलक्ष बॅरल प्रतिदिन एवढ्या प्रमाणात घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बेस मेटल्स: अमेरिकेच्या डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने एलएमई बेस मेटल्स सकारात्मक स्थितीत बंद झाले. अशा प्रकारे अमेरिकी डॉलरचे मूल्यवर्धन व चीनमधील औद्योगिक कामकाज यामुळे बेट मेटलचे नुकसान मर्यादित राहिले.

चीनने ऑगस्ट २०२० मध्ये चीनने विक्री आणि औद्योगिक कामकाज वाढवले. त्यामुळे आर्थिक सुधारणांचे स्पष्ट संकेत मिळाले. राष्ट्रीय स्टॅटिस्टिक ब्युरोनुसार, चीनचे औद्योगिक उत्पादन ५.६% नी वाढले. देशाचे प्राथमिक अॅल्युमिनिअम उत्पादन ऑगस्ट महिन्यात २.३% नी वाढले.

चीनने वितरीत केलेल्या नव्या कर्जामुळे औद्योगिक धातूंना आधार मिळाला. आर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी हे कर्ज वितरीत करण्यात आले. ऑगस्टमध्ये मंजूर झालेले कर्ज जुलै २०२० पेक्षा २९% नी जास्त आहे.

तांबे: डॉलरचे मूल्य वधारल्याने तसेच वृद्धीतील घट यामुळे एलएमई कॉपरचे दर ०.५% नी घटले व ते ६७६१ डॉलर प्रति बॅरलने कमी झाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!