स्थैर्य, मुंबई, दि. १६: यूएस फेडरल रिझर्वच्या बैठकीच्या अगोदर सोने कमजोर झाले आहे. कालच्या व्यापारी सत्रात स्पॉट गोल्ड ०.६ टक्के घसरून १८६६ डॉलर प्रति औंसवर बंद झाले. अलीकडच्या आठवड्यांतील स्थिर सुधारणेनंतर यूएस अर्थ धोरणात बदलाच्या अपेक्षेमुळे या सराफा धातूने गेल्या आठवड्यापासून नुकसान दाखवले असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
या महिन्याच्या सुरूवातीला या पिवळ्या धातूमध्ये तेजी राहिली कारण जागतिक केंद्रीय बँकेच्या उदार धोरणाने मागणी कायम राहिली. यूएस फेडद्वारे संभाव्य दर वृद्धीच्या चालीमुळे सराफा धातूचे अपील प्रभावित झाले. सट्टेबाजांनी कॉमेक्स गोल्डमधली आपली नेट लॉन्ग पोझिशन कमी केली, तेलाच्या वाढत्या किंमती आणि गुंतवणूकदार जोखीम असणार्या संपत्तीकडे वळल्याने सोन्याच्या किंमतीत घट नोंदण्यात आली.
कच्चे तेल: आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी डब्ल्यूटीआय क्रूड ०.०४ टक्क्यांच्या नाममात्र घसरणीसह ७०.९ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले. तेल मागील आठवड्याच्या आपल्या लाभावर कायम राहिले, कारण येत्या महिन्यांमध्ये जागतिक तेलाच्या खपात वाढीच्या अटकळींनी किंमतींना समर्थ दिले. लसीकरणाच्या प्रमाणात वृद्धी झाल्याने मुख्य अर्थतंत्रांमध्ये आलेल्या तेजीमुळे रिव्हाईवलची आशा ही जागतिक तेल बाजारासाठी प्रॉमिसिंग आऊटलुककडे संकेत करणारी आहे. तेलाला देखील थोडे समर्थन मिळाले आहे, कारण जागतिक इंधनाच्या वाढत्या मागणीच्या काळात जागतिक बाजारात इराणी तेलाच्या अनपेक्षित वापसीमुळे किंमती कमी झाल्या.