गोखळी ग्रामस्थांकडून विविध पदांवर विराजमान झालेल्या गुणवंतांचा सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑगस्ट २०२४ | फलटण |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदी विराज गजानन गावडे, स्थापत्य अभियंता जलसंपदा विभाग नागपूरपदी निखिल ज्ञानेश्वर गावडे, गव्हर्मेंट लॅब असिस्टंट मुंबई पदावर रोहित शुक्राचार्य भारती, एस.आर.पी.एफ. दौंड (महाराष्ट्र पोलीस) चि. तेजस गोकुळदास कांबळे आणि सातारा जिल्हा परिषदेमध्ये ‘आरोग्य सेविका’पदी कोमल बाळासाहेब जगताप व रोहिणी सदाशिव कोठावळे यांची निवड झाल्याबद्दल गोखळी ग्रामस्थांच्या वतीने गुणवंतांचा गौरव आणि ‘हर घर झाडं’ उपक्रम राबविण्यात आला. गोखळीकरांचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी यावेळी गौरवोद्गार काढले.

यावेळी फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे, मातोश्री विकास सोसायटी भाडळी खुर्दचे संस्थापक चेअरमन मोहन डांगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव बापू गावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर, सरपंच सौ. सुमनताई गावडे, श्रीराम बझारचे संचालक मारुती बापू गावडे, श्रीराम साखर कारखान्याचे संचालक तानाजी गावडे पाटील, गोखळी विकास सोसायटीचे चेअरमन तानाजी बापू गावडे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बजरंग गावडे, माजी जि. प. सदस्य विश्वासदादा गावडे, माजी सरपंच अमितभैया गावडे, गोखळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोजतात्या गावडे, माजी सरपंच नंदकुमार गावडे, रमेशदादा गावडे, गोखळी सोसायटीचे संचालक बाळासाहेब गावडे, उदयसिंह गावडे, भाजपा अनुसूचित जाती-जमाती तालुकाध्यक्ष पिंटू जगताप, संतोषदादा गावडे, राधेश्याम जाधव, उपसरपंच अभिजीत जगताप, पोलीस पाटील विकास शिंदे, प्रसाद जाधव, चांगदेव शिरतोडे, प्रमोद गेजगे, हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोखळीचे प्राचार्य सुनील सस्ते, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भोसले, पंचबिघा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सिकंदर शेख यांच्यासह गोखळी पंचबिघा, खटकेवस्ती, गवळीनगर, जगतापवस्ती परिसरातील नागरिक उपस्थित होते.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वतीपूजन आणि दीपप्रज्ज्वलन झाले. श्रावण मास आरंभनिमित्त ग्रंथ वाटप आणि ‘हर घर झाडं’ उपक्रमाचे उद्घाटन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. जनसेवक सागर गावडे पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन प्रा. पाटील सर व प्रा. विशाल चव्हाण सर यांनी व्याख्यान दिले. भव्य तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन कुमारी राजनंदिनी विठ्ठल पडर व कु. आदित्य रामदास कदम या चिमुकल्यांचे भाषण घेऊन करण्यात आले.

तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव आणि गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी सदर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मनोगताबद्दल अभिनंदन करून प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.

सूत्रसंचालन राधेश्याम जाधव यांनी केले तर आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक सस्ते सर यांनी मानले.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

Back to top button
Don`t copy text!