फलटण ते आसू रोडवरील दुकानात चोरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २० जानेवारी २०२४ | फलटण | दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी रात्री 8:00 ते 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9:00 वाजेपर्यंत गोखळी पाटी तालुका फलटण येथे एक चोरी घडली. या घटनेत अज्ञात चोरट्याने फलटण ते आसू जाणार्या रोडवरील ‘श्रीराम बॅटरीज अँड ऑटो इलेक्ट्रिकल’ दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील बॅटऱ्या व इतर साहित्य चोरून नेले.

फिर्यादी अमित मोहन शेंडगे, वय 23 वर्ष, राहणार सरडे तालुका फलटण जिल्हा सातारा, यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल गु.र.नं. 70/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305 अंतर्गत आहे. चोरट्याने दुकानातून एकूण 68,000 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले आहे.

गुन्हा दाखल तारीख वेळ 19 जानेवारी 2025 वेळ 23:56 असून, पोलीस निरीक्षक महाडिक सो मो.न. 9823562255 यांनी भेट दिली. तपासी अधिकारी एचसी ओंबासे नंबर +919823911205 यांनी तपास सुरू केला आहे. अज्ञात चोरट्याच्या शोधात पोलीस प्रयत्नशील आहेत.


Back to top button
Don`t copy text!