दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२३ । मुंबई । ग्राहकांना ई-मोबिलिटीच्या महत्त्वाकांक्षा संपादित करण्यास मदत करण्याकरिता गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या उत्पादनांच्या इब्लू श्रेणीच्या उत्पादक कंपनीने आज आयडीबीआय बँकेसोबत सहयोग केल्याची घोषणा केली आहे. या सहयोगांतर्गत भारतभरातील ग्राहकांना विशेष फायनान्सिंग पर्यायांचा लाभ घेता येईल.
इलेक्ट्रिक मोबिलिटीप्रती परिवर्तनाचा अवलंब सुलभ करण्याच्या उद्देशाने गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने आयडीबीआय बँकेसोबत सहयोगाने आपल्या संपूर्ण उत्पादन श्रेणीकरिता नाविन्यपूर्ण फायनान्सिंग पर्याय लाँच केले आहेत. गोदावरीच्या विद्यमान उत्पादन पोर्टफोलिओमध्ये इब्लू रोझी (इलेक्ट्रिक तीनचाकी) आणि त्यांच्या इलेक्ट्रिक सायकल्स इब्लू स्पिन, इब्लू थ्रिल आणि लवकरच लॉन्च करण्यात येणाऱ्या इब्लू फिओ (ई-स्कूटर) व इब्लू रायनो (ई-लोडर) यांचा समावेश आहे. आयडीबीआय बँकेसोबतच्या नवीन सहयोगांतर्गत ११ टक्के व्याजदर व १ टक्क्याच्या कमी प्रक्रिया शुल्कामध्ये अधिकतम ३ वर्षांच्या मुदतीसह कर्ज उपलब्ध होते. या फायनान्सिंग पर्यायांतर्गत ऑफर करण्यात आलेले अधिकतम एलटीव्ही ८० टक्के आहे.
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हैदर खान म्हणाले, “आम्हाला आयडीबीआय बँकेसोबत सहयोगाने इब्लू श्रेणीच्या ग्राहकांसाठी व्यापक फायनान्सिंग पर्यायांच्या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. आमचा अत्याधुनिक ई-मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदान करण्याचा प्रवास सुरूच आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, त्वरित कर्ज सुविधा देणारी ही नाविन्यपूर्ण ऑफरिंग ग्राहकांना हरित गतीशीलतेचा त्वरित अवलंब करण्यासाठी नवीन संधी देईल. आम्ही प्रदूषण-मुक्त व शाश्वत भविष्य निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासह भारतभरातील आमच्या सर्व ग्राहकांचे स्वागत करतो. आम्ही ग्राहकांना सोयीसुविधा देण्यावर लक्ष केंद्रित करत राहू, ज्यामुळे त्यांना आमची उत्पादने व सेवा सोईस्करपणे उपलब्ध होण्यास मदत होईल.”
कंपनीने ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आणि विनासायास कर्जासाठी अर्ज करण्याची व मान्यता प्रक्रियेसह ईव्ही फायनान्सिंग सोल्यूशन पर्यायांची व्यापक श्रेणी प्रदान करण्यासाठी एसआयडीबीआय, बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा बँक, पेटेल, इझीफायनान्झ, छत्तीसगड ग्रामीण बँक, रेव्हफिन, अमू लीजींग प्रा. लि; आणि पैसेलो यांच्यासोबत सहयोग केला आहे.
कंपनी ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांची ई-स्कूटर इब्लू फिओ व ई-लोडर इब्लू रायनो लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने नेटवर्कचे विस्तारीकरण करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, तसेच कंपनीचा या आर्थिक वर्षाच्या शेवटी १०० डिलर्स असण्याचा मनसुबा आहे.