दैनिक स्थैर्य । दि. २० डिसेंबर २०२१ । मुंबई । झूमकार या जगातील सर्वात मोठ्या उदयोन्मुख बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणा-या कार शेअरिंग व्यासपीठाने आज त्यांच्या वेईकल होस्ट प्रोग्रामच्या ऑफिशियल लाँचची घोषणा केली. ज्यामुळे वैयक्तिक वाहन मालकांना त्यांची वैयक्तिक कार झूमकार व्यासपीठावर शेअर करता येईल. व्यासपीठावर ८ शहरांमधून ५,००० हून अधिक कार्स असण्यासोबत कंपनीला पुढील १२ महिन्यांमध्ये व्यासपीठावर ५०,००० हून अधिक कार्स व १०० शहरांची भर होण्याची अपेक्षा आहे. भारतामध्ये सध्या जगातील सर्वात कमी खाजगी कार वापर दर आहे. आपल्या होस्ट प्रोग्रामच्या माध्यमातून झूमकार या निष्क्रिय वाहन क्षमतेचा अधिक चांगल्याप्रकारे उपयोग करण्यासाठी त्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करते. यासंदर्भात कंपनीला या प्रोग्रामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी व शहरातील वायू प्रदूषण कमी होण्याची अपेक्षा आहे.
मुलभूत उत्पादनासंदर्भात होस्ट प्रोग्राम मोफत वेईकल साइन अपपासून नियुक्तीच्या वेळी पूरक कार हेल्थ चेकअपपर्यंत सुलभ प्रक्रियेची खात्री देतो. या दोन त्रासमुल्थ पाय-यांनंतर कार व्यासपीठावर नोंदणीकृत होण्यास आणि मालकासाठी उत्पन्न कमावण्यास सज्ज असते. होस्ट प्रोग्राम वाहन मालकाला त्याच्या सोयीसुविधेनुसार कार शेअर करण्याची सुविधा देतो. कार शेअरिंग प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी झूमकार रिअल-टाइम आधारावर उत्पन्न थेट वाहन मालकाच्या बँक खात्यामध्ये जमा करते.
सध्या झूमकार वैयक्तिक वाहन मालकांना १०,००० रूपयांच्या जॉइनिंग बोनससोबत व्यासपीठावरील उच्च दर्जाच्या होस्ट रेंटिंग्जशी संलग्न अतिरिल्थ इन्सेटिव्ह्ज देते. तसेच झूमकार बाजारस्थळावर होस्टच्या सुरूवातीच्या वेळेसाठी अधिक इन्सेटिव्ह्ज देखील देते.
झूमकारचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक ग्रेग मोरान म्हणाले, “झूमकारमध्ये आमची जगातील सर्वोच्च विकसित शहरी केंद्रांमध्ये कार उपलब्धता करून देण्याचे ध्येय आहे. भारत भविष्यासाठी आमची सर्वात मोठी बाजारपेठ राहिल आणि आमचा नवीन होस्ट प्रोग्राम भारतातील शहरी गतीशीलतेशी संबंधित आव्हानांचे निराकरण करण्यासाठी स्थानिकीकृत सोल्यूशन्स निर्माण करण्याप्रती असलेल्या आमच्या कटिबद्धतेचे आणखी एक उदाहरण आहे.”