गाळेधारक आणि रहिवासी यांना जागा द्या मग मेडिकल कॉलेजचे काम करा; रयतराज संघटनेचा ठेकेदाराला इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । सातारा ।  जलसंपदा विभागाच्या ज्या जागेवर मेडिकल कॉलेजचे काम सुरू झाले आहे तेथे पूर्वी करार तत्वावर काही गाळे विक्रेते आणि कुटुंबीय राहत होते मेडिकल कॉलेजच्या निर्णयामुळे त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या पुनर्वस सुद्धा प्रश्न सुटल्याशिवाय येथे मेडिकल कॉलेजचे काम होऊ देणार नाही असा इशारा रयतराज संघटनेचे अध्यक्ष संदीप भाऊ शिंदे यांनी ठेकेदाराला दिला आहे.

या संदर्भात संदीप भाऊ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज संबंधित मेडिकल कॉलेजच्या जागेला भेट देऊन तेथील प्रकल्प अधिकाऱ्यांशी चर्चा केली . सातारा शहरांमध्ये मेडिकल कॉलेजच्या जागेचा नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न टेंडरमुळे अद्याप प्रलंबित आहे जलसंपदा विभागाची सुमारे 60 एकर जागा मेडिकल कॉलेज साठी सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात आली आहे मात्र येथील सुमारे 52 कुटुंबीय आणि काही गाळेधारक या निर्णयामुळे रस्त्यावर आले असून त्यांना ही जागा सोडावी लागली आहे.

खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हे क्षेत्र कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येते कोरेगावचे आमदार महेश दादा शिंदे यांनी या प्रश्नाची लक्षवेधी सूचना विधिमंडळामध्ये मांडली होती त्यावेळी संबंधितांच्या पुनर्वसनाचा शब्द हा तत्कालीन शासनाने दिला होता तोच संदर्भ घेऊन रयतराज संघटनेने गुरुवारी मेडिकल कॉलेजच्या जागेची पाहणी करून तेथील संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जोपर्यंत येथील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत येथे एकाही विटेचे बांधकाम होऊ देणार नाही असा इशारा रयतराज संघटनेचे अध्यक्ष संदीप भाऊ शिंदे यांनी दिला आहे.

ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की साताऱ्यात मेडिकल कॉलेज व्हावे येथे वैद्यकीय शिक्षणाची सोय व्हावी यामध्ये आम्हाला निश्चित समाधान आहे मात्र ही प्रक्रिया होत असताना फार वर्षांपूर्वी येथे राहणारे नागरिक आणि त्यांचे व्यवसाय यांना पुनर्वस्यासाठी अद्याप जागा मिळाली नाही त्यांची वाताहात सुरू आहे त्यांच्या पुनर्वसनासंदर्भामध्ये ठोस निर्णय झाला पाहिजे त्यांना हालाखीच्या परिस्थितीत सोडून इकडे दुसरीकडे मेडिकल कॉलेजचे काम करणे हे नियमाला धरून नाही त्यामुळेच हा प्रश्न तातडीने धसास लागला पाहिजे म्हणूनच या संदर्भात आम्ही जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे संदीप भाऊ शिंदे यांनी सांगितले आहे.


Back to top button
Don`t copy text!