फलटणचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सचिन कांबळे – पाटलांना संधी द्या : माजी खासदार रणजितसिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 15 ऑक्टोबर 2024 | फलटण | गत तीस वर्षांपासून फलटण तालुका हा विकासाच्या बाबतीत अत्यंत मागे पडलेला आह. फलटण तालुक्याच्या शेजारी असलेल्या बारामती तालुक्याचा जर विचार केला तर बारामती मध्ये विकास काय झाला आहे. हे सर्वच फलटणकर जाणतात कुणालातरी हरवायचे म्हणून सचिन कांबळे – पाटील यांना निवडून देण्याऐवजी ज्यांनी फलटणचा विकास केला नाही अश्यांचा पराभव करून फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सचिन कांबळे – पाटील यांना निवडून द्या; असे आवाहन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण येथील गजानन चौक येथे आयोजित जाहीर सभेमध्ये माजी खासदार रणजितसिंह बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, भाजपा फलटण विधानसभा प्रमुख सचिन कांबळे – पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह म्हणाले की; श्रीमंत रामराजे हे माझे व्यक्तिशः शत्रू नसून त्यांनी फलटणला विकासाच्या बाबतीमध्ये मागे टाकण्याचे काम केलेले आहे. ते जर विकासाला दोन पाऊल पुढे आले असते तर त्यांच्यासोबत मी सुद्धा चार पावले पुढे आलो असतो परंतु त्यांच्याकडे तब्बल तीस वर्षे सत्ता असताना सुद्धा फलटण शहराचा व तालुक्याचा सर्वांगीण विकास होऊ शकला नाही.

देशाचे नेते शरदचंद्रजी पवार हे कृषी क्षेत्रामध्ये अत्यंत निष्णात असे नेते असून त्यांच्या नखाची सर सुद्धा मला नाही व येणार सुद्धा नाही. माढा लोकसभा मतदारसंघांमधून ते जेव्हा उभे होते तेव्हा माझ्या वडिलांचा विरोध असताना सुद्धा मी त्यांना सांगितले होते की; पवार साहेबांसारखा नेता आपल्या मतदारसंघांमधून उभा असेल तर बारामती प्रमाणे आपल्या मतदारसंघाचा सुद्धा नक्की विकास होईल या बोलीवर मी लोकनेते हिंदुराव यांची समजूत काढून त्यांना सुद्धा पवार साहेबांच्या प्रचारासाठी सोबत घेतले होते. परंतु पवार साहेब हे आपल्या माढा लोकसभा मतदारसंघांमधून निवडून जाऊन सुद्धा फलटण तालुक्यासाठी नव्हे तर संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघासाठी पवार साहेबांनी काय केले हा प्रश्न मला नेहमी पडतो असे मत रणजितसिंह यांनी यावेळी व्यक्त केले.

आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहरासह फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण सर्वांनी मला निवडून द्यावे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माझ्यावर जो विश्वास टाकत विधानसभा निवडणुकीसाठी माझ्या नावाची शिफारस भारतीय जनता पार्टीकडे केली असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जर मला संधी मिळाली तर फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय मी शांत बसणार नाही; असे मत यावेळी भारतीय जनता पार्टी फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे प्रमुख सचिन कांबळे – पाटील यांनी व्यक्त केले आहे.

फलटण शहरासह फलटण तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. फलटण तालुक्यातील जनतेनेच श्रीमंत मालोजीराजे यांचा पराभव करून हरिभाऊ निंबाळकरांसारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार केले होते. फलटण मधील जनतेला फक्त विश्वास निर्माण झाला पाहिजे की; विरोधक सुद्धा सक्षम असून ते तालुक्याचा सर्वांगीण विकास करू शकतात तर फलटण तालुक्यातील जनता ही नक्कीच माजी खासदार रणजितसिंह यांच्यासोबत उभे राहील व रणजितसिंह यांच्या विचाराचा आमदार निवडून आणण्यासाठी संपूर्ण फलटण तालुका पिंजून काढण्याचे आश्वासन यावेळी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष नरसिंह निकम यांनी यावेळी दिले आहे.

यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, भारतीय जनता पार्टीचे फलटण शहराध्यक्ष अनुप शहा, जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, वाखरी गावचे माजी सरपंच तुकाराम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली आहेत.


Back to top button
Don`t copy text!