दैनिक स्थैर्य | दि. ३१ मार्च २०२२ | फलटण | सातारा जिल्ह्याचे नेते व विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस तिथीनुसार गुढीपाडवा दि. ०२ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. संपूर्ण जगामध्ये जागतिक तापमान वाढीचे विपरीत परिणाम होत आहेत. आगामी काळात जागतिक तापमान वाढीवर काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे मला शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सर्वांनी हार, गुच्छ आणण्याऐवजी झाडाचे रोप द्यावे, असे आवाहन विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी WhatsApp स्टेटस द्वारे केलेले आहे.
सातारा जिल्ह्याचे नेते व विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस तिथीप्रमाणे गुढीपाडव्याला साजरा होत असतो. सन 2022 च्या गुढीपाडवा हा दिनांक 2 एप्रिल 2020 रोजी आलेला आहे. त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी हार किंवा गुच्छ आणण्याऐवजी रोपे देण्याचे आवाहन व्हाट्सअप स्टेटस द्वारे केलेले आहे. जगामध्ये होणाऱ्या जागतिक तापमान वाढीमुळे पूर्ण निसर्गाचे संतुलन ढासळले आहे. आगामी काळामध्ये जागतिक तापमान वाढीवर काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वृक्षारोपण होणे आवश्यक आहे. या यावर्षी हार, बुके, गुच्छ ऐवजी रोपे द्यावीत, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.