गिरवीच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत वर्चस्व; तिघे फड गाजवून जिल्हास्तरावर

समर्थ मदने, गणेश पवार आणि शंभूराज मदने यांनी तालुका पातळीवर पटकावला प्रथम क्रमांक


स्थैर्य, गिरवी, दि. २० सप्टेंबर : येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी आपापल्या वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला असून, त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटात ४५ किलो वजनी गटात इयत्ता आठवीतील विद्यार्थी समर्थ सूर्यकांत मदने याने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच, १७ वर्षांखालील वयोगटात गणेश समीर पवार याने ८६ किलो वजनी गटात, तर शंभूराज संतोष मदने याने ७९ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीचे अध्यक्ष श्री. सह्याद्रीभैया कदम, संस्थेच्या सचिव श्रीमती शारदादेवी कदम, सरपंच सौ. वैशाली कदम, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवराज कदम, विद्यालयाचे प्राचार्य श्री. सावंत एस. व्ही. आणि क्रीडाशिक्षक व मार्गदर्शक श्री. हिंदुराव लोखंडे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!