भारतीय रुढी परंपरा कर्मकांड अंधश्रद्धा चालीरिती यांचा १९ व्या शतकात जबरदस्त पगडा होता. ब्रिटिशांनी सुधारणा कायदे करण्यास भारतीय चळवळीमुळे वेग घेतला. महात्मा फुले यांनी समाज्यातील पुरुषप्रधान संस्कृती व स्त्रींना दुय्यम दर्जा यासाठी समाज सुधारणेला चालना दिली.
क्रांतीज्योती सावित्रीमाई यांनी पतीकडून धुळाक्षरे शिकून भिडे वाड्यात मुलीची पहिली शाळा सुरु केली. समाज्याने अयोग्य वागणूक दिली. पण त्यांनी आपले शिक्षणाचे व्रत सुरु ठेवले. त्यांची गोड फळे आपण चाखतोया. सत्यशोधक समाज स्थापना, रात्र शाळा, अस्पृश्य शाळा, बहुजनासाठी पाण्याचा हौद मोकळा, कुमारी माता, अनाथ बालगृह सुरु, विधवा संगोपन, केशवोपन विरोध, बालविवाह व हुंडा पद्धत विरोध यासह सत्यशोधक पद्धतीने विवाह सुरु.
सावित्रीमाई खंबीरपणे महात्मा फुले यांच्याबरोबर समाजसेवा करीत होत्या. आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाला न डगमगता सर्मथपणे तोंड देऊन समाज परिवर्तन सुरु होते. आज सुद्धा कन्या जन्म नाकरणे, शिक्षणापासून वंचित, लवकर विवाह उरकणे यातून आजही आपण सावित्रीमाईचे आचार विचार स्विकारले नाहीत.
प्रत्येक घरात आज सावित्रीमाईच्या प्रतिमेबरोबरच त्यांच्या कृतीचा अवलंब झाल्यास ख-या अर्थाने उन्नीत होईल. कन्या सन्मान, गृहलक्ष्मी आदर, भगिनी व परस्री मातेसमान दृष्टिकोन ठेवल्यास निरोगी समाज निर्माण होईल. २१व्या शतकातील सावित्री कन्याने स्वालंबी जीवन, स्वरक्षण,योग्य जोडीदाराची निवड, सासर – माहेर समन्वय, भावी पिढीवर संस्कार याचा सुयोग्य मध्य साधल्यास सावित्रीमाईच्या चेह-यावर हास्य दिसेल.
ता. क. – टीव्ही वरील सावित्री – जोती मालिका प्रेक्षकांना अभावी बंद व उथळ भडक संवग विनोदी दर्जाहीन मालिका जोरात हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.