मुलींनी स्वसंरक्षणाची जबाबदारी घेण्याची गरज : सौ. जिजामाला निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०१ फेब्रुवारी २०२५ | फलटण | पवारवाडी (आसू) तालुक्यातील जय प्रतीक मंगल कार्यालयामध्ये 29 जानेवारी रोजी एक महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये किशोरवयीन मुलींना स्वसंरक्षण, शरीरात होणारे बदल, गुड टच, बॅड टच यासारख्या विषयांवर मार्गदर्शन देण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन पु. ना. गाडगीळ अँड सन्स, पुणे व अण्णा चॅरिटेबल फाउंडेशन बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून भाग घेतला आणि मुलींना स्वसंरक्षणाच्या गरजेवर भर दिला. त्या म्हणाल्या, “आजच्या काळात मुलींनी आपल्या स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जुदो, कराटे, लाठी व काठी यासारख्या शिक्षणाचे महत्त्व सांगितले.”

पवारवाडी (आसू) तालुक्यातील जय प्रतीक मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या या कार्यशाळेमध्ये प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सातवी ते नववी किशोरवयीन मुलींना सामील करण्यात आले होते. रिफ्लेक्शन फाऊंडेशन पुणे या संस्थेच्या नामांकित महिला वक्त्यांनी मुलींना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. किशोरवयातील आकर्षण, स्वसंरक्षण, शरीरात होणारे बदल, गुड टच, बॅड टच यासारख्या विषयांवर खोलवर चर्चा करण्यात आली.

हनुमंत मोहिते अप्पा हे आपल्या ट्रस्ट मार्फत राबवत असलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. निंबाळकर यांनी सांगितले. महाराष्ट्रभर फलटण, सातारा, ढवळ, सासवड, साखरवाडी, नारायणगाव सह अनेक शाळांमध्ये यापूर्वी असे उपक्रम राबविण्यात आले आहेत.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नाथा भोसले यांनी केले, तर प्रास्ताविक हनुमंत मोहिते यांनी केले. पवारवाडी, गोखळी, आसू, हणमंतवाडी, खटकेवस्ती येथील मुली या कार्यशाळेमध्ये सहभागी झाल्या होत्या. मुलींसाठी चहा, नाश्ता देण्यात आला व छ.शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन केले गेले.

या कार्यशाळेमध्ये फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पै बजरंग गावडे, कारभारी अण्णा चॅरिटेबल फाउंडेशनच्या विश्र्वस्त सौ. शुभांगी ताई सातव, संचालिका सौ.सुप्रियाताई मोहिते, ज्योतिर्लिंग हायस्कूलचे प्राचार्य अण्णा ननवरे, हनुमान माध्यमिक विद्यालय गोखळीचे प्राचार्य सुनील सस्ते, आसू गावचे पोलिस पाटील अशोक गोडसे, भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या धनश्री बजरंग गावडे, अनिल संपकाळ, पवारवाडी केंद्र शाळा केंद्र प्रमुख संजय बोबडे, बरड केंद्र प्रमुख संजय धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भागवत, सुरेश पवार, शुभांगी भोसले – बोंद्रे, शिक्षणविस्तार अधिकारी मठपती आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!