सैदापूर येथे शॉक लागून मुलीचा मृत्यू


दैनिक स्थैर्य । दि. ८ जुलै २०२१ । सातारा । शहरालगत असणाऱ्या सैदापूर येथे घरातील पाण्याच्या मोटारीची पिन लावत असताना शॉक लागल्याने एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सानिका सुरेश घाडगे (रा. सैदापूर, ता. सातारा) असे शॉक लागून मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, सानिका ही मंगळावार, दि. ६ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घरी पाणी भरत होती. यावेळी ती विद्युत मोटारीची पिन घरात असणाऱ्या स्वीच बोर्डला जोडण्यासाठी गेली. याचवेळी तिला शॉक लागला आणि ती बेशुध्द झाली. या घटनेनंतर तिला बेशुध्दावस्थेतच क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. याबाबतची खबर वैद्यकीय अधिकारी दीपाली राठोड यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कदम हे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!