
दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
सासकल (ता. फलटण) येथे सन २००५ व २००७ च्या इयत्ता दहावीच्या बॅचकडून शिवशंकर माध्यमिक विद्यालयास एलईडी टीव्ही संच भेट देण्यात आला.
शाळेच्या भौतिक सुविधांसह शैक्षणिक गुणवत्तेसाठी माजी विद्यार्थ्यांनी यापूर्वीही योगदान दिले आहे. यापुढे शिवशंकर माध्यमिक विद्यालयास सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष व ग्रंथालय उभारण्याचा माजी विद्यार्थ्यांनी संकल्प केला आहे. अनेक सुधारणा व शैक्षणिक गुणवत्तेसाठी माजी विद्यार्थी सक्रिय आहेत.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सत्यवान मोहिते सर, सहशिक्षक चंद्रकांत सुतार, धनाजी मुळीक, वैशाली सस्ते मॅडम, बाळासो सोनवणे उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश्वर पिसाळ, राहुल मुळीक, राम चांगण, अभिजित दळवी, सचिन फडतरे यांनी एलईडी टीव्ही संच मुख्याध्यापक, विद्यार्थी व सहशिक्षकांकडे सुपूर्द केला.