कुरवलीच्या ओंकार वृद्धाश्रमास पुस्तकांची भेट


दैनिक स्थैर्य । 23 मे 2025। फलटण । कुरवली ता. फलटण येथील ओंकार वृद्धाश्रमाच्या ग्रंथालयास सेवाभावी फाउंडेशनचे अध्यक्ष, माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांच्यावतीने पंचवीस पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. तसेच ज्येष्ठ साहित्यिक सर्ज्याकार सुरेश शिंदे यांनीही पुस्तके भेट दिली.

फलटण ज्येष्ठ नागरिक संघांच्यावतीनेहा वृद्धाश्रम चालविला जातो. या वृद्धाश्रमात अनेक स्त्री पुरुष राहतात. या वृध्दाश्रमात ग्रंथालय सुरू केले. या ग्रंथालयासाठी साहित्यप्रेमी, सेवाभावी फाउंडेशनचे अध्यक्ष, माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांच्या वतीने कथा, कादंबरी, चरित्र, कविता, ललित लेख अशा पंचवीस पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. तसेच ज्येष्ठ साहित्यिक सर्ज्याकार सुरेश शिंदे यांनीही पुस्तके भेट दिली.

यावेळी दीपक दोशी, व्ही.जी. माने, प्रभाकर भोसले, प्रा विक्रम आपटे, सुभाष देशपांडे, साहित्यिक महादेवराव गुंजवटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी मनोगते व्यक्त केले. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ सदस्य श्री जोशी यांनी पुस्तके भेट दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्राचार्य शांताराम आवटे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य अर्जुन रुपनवर यांनी आभार मानले. यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ सदस्यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!