भूतदयेची नौटंकी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


3 जून पर्यन्त कोणी तरी हत्तीणीला फटाके टाकून अननस चारल्याने गर्भवती हत्तीणी मरण पवल्याची घटना घडल्याची बातमी सगळीकडे झळकली. त्यामुळे स्वाभाविक वाईट वाटून सगळीकडे करुणेचे पूर आले. अक्षय कुमार पासून श्रद्धा कपूर पर्यन्त सर्वांनी यावर ट्विट केले. मात्र 4 जून पासून चौकशीतून हे स्पष्ट होत गेले की शेती व फळबागा रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांपासून वाचवण्यासाठी शेतकरी दबावाने फुटणारे फटाके खाद्य पदार्थात टाकून ठेवतात हा तो प्रकार होता. मल्याळम भाषेत याला पन्ंनी पडकम (डुक्कर फटाका) असं म्हणतात. शेतात शिरू पाहणारे वन्य भटके प्राणी जेव्हा ते खातात तेव्हा तोंडात स्फोट होऊन त्यांना हानी होते व ते पळ काढतात. असेच एक अननस हत्तीने खाल्ले आणि केरळ च्या अट्प्पाडीच्या सीमेवरील सायळेंत व्हॅली जंगलातील गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला. शक्तीशाली फटाके तिच्या तोंडात फुटल्याने या हत्तीणीचा जबडा तुटून जबर दुखापत झाली होती. 20 दिवस वेदना सहन करत उपाशी पोटी पाण्यात उभं राहिल्यानंतर 27 मे रोजी या गर्भवती हत्तिणीचा पलक्कड जिल्ह्यातील वेळियर नदीतच मृत्यू झाला.

याच प्रकारच्या सापळयात सापडल्याने मागच्या वर्षी तेलंगणा मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. 2014 साली बंगळुरू मध्ये 2 व्यक्ति जखमी झाले होते. डिसेंबर 2017 साली मध्यप्रदेशच्या विदिशा शहराच्या अहमदपूर रोडवर अश्याच प्रकारचा खाद्यपदार्थात बांधून ठेवलेला एक फटाका गायीच्या तोंडात फटल्यानंतर आरएसएसच्या प्रायोजित ‘शंखनाद’ कडून मुस्लिमाने हे विस्फोटक गायीला खाऊ घातल्याचा प्रचार सुरू केला. गर्दीने आसपासच्या टपरींवर जाळपोळ सुरू केली. गाय हे भाजप व संघ परिवारासाठी हुकूमी एक्का राहिला आहे. चौकशीअंती विदिशाचे पोलिस अधीक्षक यांनी जाहीर केले की हा डुक्करांना मारण्यासाठी शेतकरीच वापरत असलेला सुवरमार बॉम्ब आहे. 2017च्याच जानेवारी महिन्यात महाराष्ट्राच्या मालवण तालुक्यात अश्याच प्रकारे एक गाय असले बॉम्ब खाऊन स्फोट झाल्याने मेली होती. 

ह्या घटनेनंतर संघपरिवाराला यात संधी दिसली नसती तर नवलच. 4 जून पासून समाज माध्यमांवर भाजपची आयटी सेल कामावर लागली. सगळीकडे शिक्षित लोकं असं करतात, हे डावे आणि मुसलमानांनी घडवून आणले, यांना यापुढे कोणतीही मदत करायची नाही अश्या सारख्या प्रकारच्या पोस्ट्स सगळीकडे फिरू लागल्या. यात प्रसारमाध्यमांनी वेगळा घोळ घातला. द हिंदू, एनडीटीव्ही, टाइम्स नाऊ, हिंदुस्तान टाइम्स, इंडिया टुडे, इकॉनॉमिक्स टाइम्स, एएनआय, रिपब्लिक इंडिया व इतर अनेक प्रसार माध्यमांनी मल्लपुरम जिल्ह्यात ही घटना घडल्याची बातमी दिली होती. भाजपने याचाच वापर करून ह्या जिल्ह्याला लक्ष्य करायला सुरू केले त्यामागचे कारण म्हणजे हा जिल्हा मुस्लिम बहुल असून तिथची 70 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. वास्तव पाहता ही घटना मल्लपुरम जिल्ह्याला लागून असलेल्या शेजारच्या पलक्कड जिल्ह्यात घडल्याचे स्पष्टीकरण स्वतः तिथच्या मुख्यमंत्री पिनरई विजयन आणि केरळचे वनमंत्री के. राजू यांना द्यावी लागले. या पलक्कड जिल्ह्याची 67 टक्के लोकसंख्या हिंदू धर्मीय आहे. भाजप नेते व ट्रोल आर्मीकडून हत्तीच्या मृत्यूसाठी साक्षरता आणि मालप्पुरम जिल्ह्यातील मुस्लिम बहुल लोकसंख्या जबाबदार असल्याचे बिनबुडाचे आरोप सुरू झाले. खासदार मनेका गांधी यांनी याप्रकरची सांप्रदायिक प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे. मानवसंसाधन विकास मंत्री प्रकाश जवडेकर यांनी ही त्वरित संतप्त प्रतिक्रिया दिली. मुळात सबरीमला पासून तर सर्व प्रकारचे शर्थीचे प्रयत्न करून ही भाजपला तिथले मतदार भाजपला महत्व देत नाहीत हेच भाजप आणि संघाचा अवघड जागेचं दुखणं झालं आहे. अमित शहा आणि मोदींना तिथे कोणी विचारात नाही. कोविड संक्रमणाशी लढण्यसाठी पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकींसाठी केरळ मॉडेल यशस्वीपणे राबवणारे केरळचे मुख्यमंत्री जात नाहीत व त्याला वेळेचा अपव्यय म्हणल्याने मोदीभक्तांच्या फार जिव्हारी लागले आहे.

भाजपच्या भूतदयेच्या या राजकीय नौटंकीचे एक मोठे उदाहरण भाजपशासित राज्य हिमाचल प्रदेश आहे. या राज्यात उत्पात मजवणार्‍या दोन लाख माकडांचा धोका 10 जिल्ह्यातील 2500 पंचायतमध्ये पसरलेला आहे. शेती व फळबाग उत्पादनांना झालेल्या नुकसानीमुळे वर्षाकाठी 500 कोटी रुपयांचे नुकसान होत असते. वर्ष 2016 साली भाजप शासित हिमाचल राज्य सरकारच्या प्रस्तावावर 53 तालुक्यांमद्धे माकडांवर बंदी घळण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली. नसबंदीच्या शस्त्रक्रियेसाठी येणार्‍या माकड पकडण्याच्या गाडीला माकडे ओळखू लागली व पळ काढू लागली. वैतागून शेतकरी माकडांना जेवणातून विश देऊन मारू लागले. मग राज्याचे वनमंत्री ठाकूरसिंग भरमौरी यांनी माकड मारणार्‍या व्यक्तिला प्रती माकड 300 रुपये देण्याची घोषणा केली जी नंतर 700 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली. दोन वर्षानी या रकमेत वाढ करून जर व्यक्तीने एखाद्या विशिष्ट कळपात 80 टक्के माकडांना पकडले तर प्रत्येक माकडाला एक हजार रुपये दिले जाईल अशी योजना भाजप सरकार कडून जाहीर करण्यात आली. यात शेकडो माकडे मारली गेलीत. मात्र हनुमानाचा प्रतीक असलेल्या माकडासोबत एवढे होत असताना मेनका गांधी व इतर भाजप- संघातील दयाळू लोकांना यावर प्रतिक्रिया द्यावी अशी वाटली नाही कारण इथे भाजपचे सरकार आहे.

देशभरात जंगलाजवळच्या मानवी वस्तीत विद्युत तारा लावून वन्य प्राण्यांचा वावर नियंत्रित केला जातो. 2017 साली एकट्या कर्नाटक राज्यात 107 हत्ती या विद्युत धक्क्याने मेले. मागच्या काही दिवसांमध्ये 2 हत्ती कर्नाटकात असेच मेले. त्यावर मात्र संघ परिवार, भाजप आणि आयटी सेल कडून अश्रु ढाळले गेले नाही की चौकशी करण्यात आली नाही. एका हत्तीणीच्या दुर्दैवी मृत्यूवर अत्यंत दायवान व प्राणिप्रेमी असल्याचा आव आणून भावनिक व सांप्रदायिक प्रतिक्रिया देणारी भाजप आणि संघ मात्र प्राण्यांवर इतर प्रकारे दर रोज चालू असलेल्या आणि धार्मिक आध्यात्मिक हेतूने करण्यात येत असलेल्या मानवी क्रूरतेवर बोलल्याचे दिसत नाही. तिथे ते मताचे व धर्माचे राजकारण करून त्या प्राणी हत्येलाच बरोबर ठरवतात. बकरीदच्या वेळी बकर्‍यांचा बळीवर यांना करुणेचे पाझर फुटते परंतु स्वतः हिंदू धर्मात अनेक ठिकाणी मुक्या प्राण्यांची निर्दयतापूर्वक बळी दिली जाते त्यावर भाजप व संघाचे लोकं गप्प बसतात.

भारतातील पूर्वेकडील राज्यांमध्ये नवरात्रात दुर्गा पूजा उत्सवांचा एक भाग म्हणून पशुबळी दिली जाते. राजस्थानचे राजपूत नवरात्रात शस्त्रे व घोड्यांची पूजा करतात आणि कुलदेवी म्हणून पूजलेल्या देवीला बकरीचा बळी अर्पण करतात – अशी प्रथा आजही काही ठिकाणी चालू आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दक्षिण भारतीय राज्यांमध्ये स्थानिक देवता किंवा कुल देवतांसमोर बळी दिली जाते. कर्नाटकात बलिदान देणारी देवी रेणुका देवी समोर म्हैस किंवा बकरीची बळी दिली जाते. महाराष्ट्रातील कथार किंवा कुतडी समाज कुटुंबा मुल कुळदेवी सप्तशृंगीची पूजा करतो आणि बकरीचा बळीही अर्पण करतो. पुण्याच्या सभोवतालच्या प्रदेशात, बकरी आणि कोंबड्याची बळी वेताळ देवाला दिली जाते. नेपाळ, भारतातील मधील आसाम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील देवीच्या देवळांमध्ये बकरे, कोंबडी, कबूतर आणि नर म्हशींचा बळी दिला जातो. भारतातील ओरिसाच्या बौध जिल्ह्यात कंधेन बुधी हे कांतमलचे राज्य करणारे देवता आहे. दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयोजित केलेल्या जाणार्‍या वार्षिक यात्रा/जत्रा उत्सवाच्या निमित्ताने बकरी आणि पक्षी या प्राण्यांचा बळी अर्पण केला जातो. घुसेरी पूजा हे कंधेन बुद्ध यात्रेचे मुख्य आकर्षण आहे. घुसूरी म्हणजे एक लहान डुक्कर, जो दर तीन वर्षांनी देवीला बळी दिला जातो. बळी जत्र्यादरम्यान, ओरिसाच्या संबलपूर येथील तिच्या मंदिरात नर बक्यांचा बळी अर्पण केला जातो. ओडिशा, सोनेपुरचा बळी जत्रा हा देखील सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जाणारा वार्षिक उत्सव आहे. इथे देखील समेश्वरी, सुरेश्वरी आणि खांबेश्वरी या देवींच्या धार्मिक विधीचा अविभाज्य भाग पशुबलि असल्याने या वार्षिक उत्सवाला बली जत्रा असं म्हणतात.

हिंदू बहुल देश असलेला नेपाळ हा असाच संघाचा आवडता देश आहे ज्याला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी अनेक मनसुबे बांधले गेल्याचे आरएसएसचे प्रवक्ते बोलून दाखवतात. इथे सुमारे 255 वर्षांपूर्वी भगवान चौधरी नावाच्या नेपाळी शेतकर्‍याने जेव्हा गढीमाई देवीला रक्त अर्पण केले तर त्याचे प्रश्न सुटून गेल्याची आख्यायिका पसरल्यानंतर गढीमाई उत्सव सुरू झाल्याचा स्थानिकांचा विश्वास आहे. कर्मकांडातून केलेल्या पशूंच्या कत्तलीतून नशीब उजळतो व देवी गढीमाई त्यांची इच्छापूर्ती करते असा त्यांना विश्वास आहे. याच भावनेतून पशुबळी वाढत गेली. या उत्सवाच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्यासाठी स्थानिक व्यापारी- राजकारण्यांनी बरियारपूरकडे जाणार्‍या रस्त्यावर स्वागत चिन्हे व कमानी उभारल्या. एका नोंदीप्रमाणे 2009 साली या उत्सवात उच्चांक गाठत सुमारे पाच लाख म्हशी, शेळ्या, कबूतर आणि इतर प्राण्यांची बळी दिली गेली. यानंतर या प्रथेविरोधात तिथच्या कम्युनिस्ट पक्ष- जनसंघटनांनी आणि काही संस्थांनी जनजागृतीची मोहिमे राबवली. 2014 साली या सामूहिक पशुबलीच्या आकड्यात घाट होऊन ती 3 लाखापर्यंत आली. हा प्रकरण नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने जनावरांच्या हत्येवर बंदी घातली. तिथच्या कम्युनिस्ट सरकारने कार्यकर्ते व पोलिसांच्या मदतीने प्राण्यांची अवैध तस्करी रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे ज्याचा विरोध कट्टर हिंदुत्ववादी संघटना करतात आणि त्याला देखील भारताच्या आरएसएसचा व भाजपचा छुपा पाठिंबा आहे.

याला एक नमूद करण्यासारखा उदाहरण त्रिपुरा देखील आहे. त्रिपुरा राज्यात तीन दशके राज्य करणार्‍या डाव्या आघाडीला तिथच्या एका मंदिरात 500 वर्षांपासून चालू असलेली प्रथा मोडती आली नाही. तिथे राज्य सरकारच्या तरतुदीनुसार, माता त्रिपुरसुंदरी मंदिरात जिल्हा प्रशासनाच्या संरक्षणाखाली दररोज एका बाकार्‍याचे बळी अर्पण केले जात असे आणि दिवाळीसारख्या विशेष प्रसंगी जास्त मोठ्या प्रमाणात बळी दिला हात होता. मार्च 2018 मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर यांनी बलिप्रथेचे उदात्तीकरण राजकीय फायदा घेण्याच्या हेतूने त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी माता त्रिपुरसुंदरी मंदिरासाठी एक ट्रस्ट स्थापन केला आणि या मंदिरातील सर्व कामांची देखरेख मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली करणायचा निर्णय लागू केला. रोज एका बळीसाठी प्रसिद्ध असलेल्या या मंदिराकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वैष्णोदेवी मंदिराप्रमाणे विकसित करण्याचे त्यांनी ठरवले. परंतु शेवटी ऑक्टोबर 2019 साली उच्च न्यायालयाच्या निकालानंतर या बळीप्रथेवर बंदी घातली घेतली.

पोंगल सणाच्या वेळी जल्लीकट्टू हा बैलांचा लोकप्रिय खेळ तमिळनाडूच्या मदुराई जिल्ह्याच्या पलेमेडू, अलंगानल्लूर आणि अवानियापुरम ही तीन मुख्य ठिकाणावर आयोजित केला जातो. या खेळात माणूस धावत्या बैलावर झेप घेत त्याच्या कुरुपला धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि घसरुन किंवा दुखापत न करता जनावरासह पुढे धावत जातो. ‘जल्लीकट्टू’ हा तामिळ भाषेचा शब्द आहे ज्यात ‘सल्ली कासू’ म्हणजे नाणी व कट्टू म्हणजे बक्षीस रक्कम म्हणून बैलांच्या शिंगांना बांधलेले पैसे असा आहे. 2017 साली या खेळावर बंदीसर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर बंदी उठवण्यात यावी म्हणून केंद्र आणि तामिळनाडू सरकारने कायदेशीर पावले उचलावी या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. 2008 ते 2014 दरम्यानच्या काळात जल्लीकट्टू कार्यक्रमात 43 माणसं आणि 4 बैल मारले गेले. 2017 साली 23 लोकं मेलीत आणि 2500 लोकं घायाळ झाले. 2020 मध्ये देखील या उत्सवात 5 लोकांचा मृत्यू झाला. जळीकट्टू उत्सवात बैलांची सुटका होण्यापूर्वी आणि त्यांच्या बैलाला वश करण्याच्या प्रयत्नांच्या वेळीही बैलांना सोडविण्यापूर्वी जनावरांच्या कल्याणशी संबंधित आहे. बैल सोडण्याआधी तीक्ष्ण काठीने किवा खिळ्याने टोचले जाते, त्याची शेपटी हाड तुटू शकते इतकी वाकवली जाते किंवा त्यावर चावा घेतला जातो. त्यांनी आक्रमक व्हावे म्हणून त्यांना दारू पाजली जाते किंवा डोळ्यात मिरची पूड उधळली जाते. बैलाला वश करण्याच्या प्रयत्नांमध्ये, चाकू, दांडे, किंवा ठोसे मारणे, उडी मारणे आणि जमिनीवर खेचण्यासाठी विविध अवजाराने त्यांच्यावर वार केला जातो. या भयानक परिस्थितीतून मार्ग काढण्यसाठी बैल गर्दीत घुसतात त्यात माणसे व बैल दोन्ही मारली जातात किंवा त्यांची हाडे तुटून कायमची अपंग तरी होतात. या प्राणघातक आणि विकृत होत चाललेल्या प्रथेबाबत पर्यावरण आणि वन मंत्रालयाने २०११ मध्ये एक अधिसूचना जारी केली करून बैलांच्या वापरावर बंदी घातली. 7 मे 2014 रोजी, सर्वोच्च न्यायालयाने राज्य कायदा रद्द केला आणि जल्लीकट्टूवर पूर्णपणे बंदी घातली. मात्र भाजपकडून याचा राजकीय फायदा उचण्यासाठी या प्रथेला तामिळ अस्मितेशी जोडून त्याला त्यावर हल्ला ठरवला गेला आणि जळीकट्टू सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

केरळच्या धार्मिक उत्सवांमध्ये वापरण्यात येत असलेल्या हातींची ही दुर्दशाच असते. धार्मिक उत्सवांमध्ये या हत्तींची सुमारे 35-40 डिग्री तापमानात परेड सजवून परेड काढली जाते. गर्दीतून ढोल-ताशे व फटाक्यांच्या गजरात गरमीने तापलेल्या काळ्या डांबर रोडवर पाय भाजत असलेल्या हत्तीची छान पैकी मिरवणूक काढली जाते. अनेक ठिकाणी पाळीव हत्तींना हत्तीला साखळीत बांधून ठेवल्याने साखळीने त्वचा घासल्यागेल्याने व जखमांमुळे पाय, डोकं, मान, आशा अनेक ठिकाणांची त्वचा गळून पळून तिथे शरीराच्या रंगापेक्षा वेगळी दिसून पडणारी पांढरी चमडी दिसून पडते. दोन्ही कानांत माणसांप्रमाणे छिद्र करून त्यात तार-लोखंडांचे वाजणारे मोठे-मोठे घुंघरू टाकण्यात येतात. अश्या अनेक गोष्टींवर भाजपने कधीही आक्षेप घेतले नाही. प्रथेच्या नावाखाली हे सर्वकाही खपवले जाते.

केरळमध्ये हत्तीणीचे जीव गेल्यानंतर भाजपकडून चालू असलेले प्रचार प्रपंच अत्यंत हास्यास्प्द आहेत. देशात गायीच्या नावाखाली मॉब लिंचिंगच्या घटनांमधे अनेक मुस्लिम तरुण मारले गेले. अनेक ठिकाणी दलितांची सवर्णांकडून हत्याच्या घटना वाढल्या तेव्हा देखील संघ परिवार आणि भाजप नेते गप्पच राहिले. अर्थात या हत्या घडवण्यासाठी जी मानसिकता तयार करावी लागते ती जातिवादी व जातीयवादी मानसिकता भाजपच्या विखारी प्रचारातून आपोआप ही तयार होत जाते.

शेतकरी आपली शेती वाचवण्यासाठी जे करतात ते जर त्यांनी केले नाही तर ते बर्बाद होतील. या बळीप्रथांमध्ये अत्यंत निर्दयी पद्धतीने धार्मिक कारणांसाठी पशूंचा जीव घेतला जातो. ते खरं तर माणसासाठी जीवन मरणाचा प्रश्न नाहीच आहे. या निर्दयी हत्येचा विरोध कधीही भाजप आणि संघ परिवाराकडून करण्यात आलेले नाही. त्याउलट ज्यांनी कोणी या वैज्ञानिक प्रथांचा विरोध केला त्यांचाच विरोध सनातनी, रुढीवाद्यांना सोबत घेऊन आपल्या राजकीय फायद्यासाठी भाजपकडून करण्यात आले. डाव्या संघटना, पेटा, अंधश्रद्धा निर्मूलन समिति, आंबेडकरवादी तरी यावर स्पष्ट विरोधाची भूमिका घेतात. अहिंसक, करुणामय मार्गाने धार्मिक सण साजरे करणे, गरीबांना भोजन वाटप करणे, जनावारांसाठी निवारा किंवा आहाराची व्यवस्था अश्या प्रकारची विनंती त्यांच्याकडून केली जाते. परंतु परंपरावादी मंडळी देवाला प्रसन्न करण्यासाठी मात्र या मूक प्राण्यांच्या जिवावर उठून असतात.

हत्तीच्या मृत्यू बाबत आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया संतप्त व भावनिक होता परंतु भाजपचा या घटनेवरचा हत्तीवरचा दुख दिखावटी आणि राजकीय संधिसाधुपणाचा आहे यात तीळमात्र शंका नाही.

एड संजय पांडे, [email protected]


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!