
दैनिक स्थैर्य । 31 मार्च 2025। फलटण । सोशल मीडियावर सतत नवीन ट्रेंड्स येत असतात आणि त्यातील अधिकांश लोकप्रिय होतात. अलीकडे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘घिबली’ इमेज तयार करण्याचा ट्रेंड छान चालू आहे. चॅट जिपीटी (ChatGPT) ने लाँच केलेल्या या नवीन फीचरने नेटीझन्सचे लक्ष वेधले आहे. हे फीचर वापरून लोक सोशल मीडियावर अनेक फोटो अपलोड करत आहेत.
हे तंत्रज्ञान इतके लोकप्रिय झाले आहे की त्याची भुरळ सर्वसामान्य युजर्सपासून ते राजकारण्यांनाही पडली आहे. फलटणच्या राजकारण्यांनीही या तंत्रज्ञानाचा वापर करून सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांनी ‘घिबली’ इमेज वापरून भावनिक क्षण सोशल मीडियावर व्यक्त केले आहेत.
‘घिबली’ आर्ट ही मूळची जपानी कलाकृती आहे. ‘स्टुडिओ घिबली’ नावाचा जपानी अॅनिमेशन स्टुडिओ तयार करण्यात आघाडीवर आहे. ही कला भावनिक रित्या युक्त या स्टोरी लाइन आणि हाताने अॅनिमेशन कॅरेक्टरचा वापर करून दर्शवली जाते. तंत्रज्ञानाने संयुक्त या जपानी कलेची आणि भावना व्यक्त करण्याची नवी माध्यमे आता सोशल मीडियावरही पाय घालत आहेत.