
![]() |
येथील बाजार समितीत घेवडा खरेदीची माहिती घेताना नुतन सभापती शशिकांत देशमुख, तुकाराम यादव व इतर. (छाया : समीर तांबोळी) |
स्थैर्य, कातरखटाव, दि. ३० : वडूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डात चालू वर्षी घेवड्याची उच्चांकी आवक होत आहे. यावर्षी वरुण व वाघा घेवड्यास 5 हजार ते साडेसहा हजार प्रति क्विंटल दर मिळत आहे.
येथील मार्केट यार्डात पाच प्रमुख व्यापारी घेवडा, मुग, उडीद, चवळी खरेदी करत आहेत. दररोज घेवड्याची चांगली आवक होत आहे. आत्तापर्यंत पंधरा दिवसात 200 पेक्षा अधिक ट्रक माल बाहेर गेला आहे. हिरव्या मुगाचीही चांगली आवक असून मुगास 6 हजार 200 ते 8 हजारा पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहे. अश्याच प्रकारे चवळी व पिवळ्या मुगासही चांगला दर मिळत असल्याने खटाव तालुक्याबरोबर माण तालुक्यातील खरीप शेती माल वडूज मार्केट यार्डात येत आहे. व्यापारी काही शेतकर्यांना तात्काळ रोख तर काहींना बँक अकाऊंटवर पेसे पाठवत आहेत. अशीच परस्थिती पुसेसावळी येथील उपबाजाराचीही आहे.
नवनिर्वाचित सभापती शशिकांत देशमुख, उपसभापती प्रतिनिधी तुकाराम यादव व सहकार्यांनी घेवडा खरेदी प्रक्रियेची नुकतीच समक्ष पाहणी केली. यावेळी संस्थेचे सचिव शरद सावंत, उपसचिव अशोक पवार, लेखाधिकारी हणमंत मदने, विजय गोडसे, श्री. सर्वगोड, व्यापारी सुहास राजमाने, रोहित राजमाने आदिंसह कर्मचारी उपस्थित होते.