घाट रस्त्यारील दरडी पडण्याच्या सत्रास सुरुवात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २३ : परळी खोरे हा अतिवृष्टीचा भाग म्हणून ओळखला जातो. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली होती; परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या मान्सूनने पुन्हा एकदा परळी खोर्‍यात दमदार आगमन केल्याने नदी, नाले व ओढे खळखळून वाहू लागले आहेत. त्यातच घाट रस्त्यारील दरडी पडण्याच्या सत्रास सुरुवात झाली आहे.

परळी ते केळवली हा रस्ता ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आला आहे. परंतु ह्या वर्षी नालेसफाई व खुदाई न झाल्याने डोंगरावरून आलेला मातीचा भराव हा रस्त्यावर येऊन वाहतूक ठप्प होत आहे तसेच घाट असल्याने वाहतूक धोकादायक ठरत आहे. कातवडी ते केळवली हा रस्ता घाटमार्गे असून दोन ठिकाणी रस्ता पूर्णपणे तुटला असून जागोजागी पाणी हे रस्त्यात येत आहे. काही ठिकाणी पाणी वाहून रस्त्यालगतची माती वाहून गेल्याने रस्ता धोकादायक स्थितीत आला आहे.

परळी ते केळवली हा रस्ता गेली कित्येक वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. त्यातच यावर्षी नालेसफाई न झाल्याने बहुतांश ठिकाणी डोंगरावरून आले मातीचे लोट हे रस्त्यावर येत आहेत. त्यातील येथील घाटात दोन-तीन ठिकाणी मातीचा भराव आल्याने वाहतूक करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे केळवली येथील हनुमान युवा मंडळाने श्रमदानातून तुटलेल्या रस्त्यात भराव टाकून थोडी नालेसफाई केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!