
जितेंद्र सरगर यांचे वडील; अल्पशा आजाराने प्राणज्योत मालवली.
स्थैर्य, फलटण, दि. २८ डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुलक्षणा सरगर यांचे सासरे आणि जितेंद्र आप्पा सरगर यांचे वडील घनश्याम (आण्णा) गोविंद सरगर यांचे आज (रविवारी) सकाळी ७.०० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी ११.०० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

