
स्थैर्य, फलटण : वाढत्या वीजबिलांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी नागरिकांना आता ‘रूफटॉप सोलर’चा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. घरगुती छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवून वीज निर्मिती करणे शक्य झाले असून, यावर शासनाकडून ७८ हजार रुपयांपर्यंतचे अनुदानही मिळत आहे. एकदा गुंतवणूक केल्यास २५ वर्षांपेक्षा अधिक काळ मोफत वीज मिळवून देणारी ही योजना सर्वसामान्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे.
टाटा पॉवर, वारी आणि इस्टमॅन यांसारख्या देशातील नामांकित कंपन्यांची सौर ऊर्जा उत्पादने आता फलटणमध्ये सहज उपलब्ध झाली आहेत. यामध्ये रूफटॉप सोलर सिस्टीमसह, सोलर कृषी पंप, सोलर वॉटर सिस्टीम आणि सोलर स्ट्रीट लाईट यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना त्यांच्या वीज बिलात ९० टक्क्यांपर्यंत बचत करणे शक्य होणार आहे.
फलटणमध्ये ही सुविधा किचन उपकरणे क्षेत्रात १९९३ पासून विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या श्री. राजेश हेंद्रे उपलब्ध करून दिली आहे. हेंद्रे कुटुंबीयांची पुढची पिढी, वल्लभ हेंद्रे आणि श्रीनिवास हेंद्रे, यांच्या पुढाकारातून हा सौर ऊर्जा व्यवसायाचा विस्तार करण्यात आला आहे.
ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेने एक विशेष योजना देखील जाहीर केली आहे. दिनांक १ सप्टेंबर ते ३० नोव्हॅंबर या कालावधीत सोलर सिस्टीम बसवणाऱ्या ग्राहकांना किचन चिमणी, इलेक्ट्रिक वॉटर हिटर किंवा इलेक्ट्रिक शेगडी यांसारखी उत्पादने भेट म्हणून दिली जाणार आहेत.