आपलं घर सुरक्षित करण्यासाठी आजच ‘होम इन्श्युरन्स काढा; होम इन्श्युरन्ससाठी परिपूर्ण गाईड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


प्रत्येकासाठी घर ही सर्वात किंमती आणि मौल्यवान संपत्ती असते. आयुष्याच्या संचित कमाईतून हक्काच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात येत. आपलं घर सुरक्षित राहावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी विविध पावलं उचलली जातात. सिक्युरिटी कॅमेरे लावणं असो की घरातून बाहेर पडताना काळजीनं दरवाजे बंद करणे किंवा कोणतीही आकस्मिक दुर्घटना टाळण्यासाठी घराला इलेक्ट्रिक फिटिंग करणे. खरंतर घराच्या सुरक्षिततेचे विविध मार्ग आपल्याला निश्चितच ठाऊक आहेत. परंतु घराच्या सुरक्षिततेचा प्रभावी मार्ग फारच कमी लोकांना माहिती आहे. तो मार्ग म्हणजे ‘होम इन्श्युरन्स’. या लेखातून तुम्हाला होम इन्श्युरन्स बाबत परिपूर्ण माहिती मिळेल.

होम इन्श्युरन्स म्हणजे काय? आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, चोरी, आग इ. सारख्या आकस्मिक घटनांपासून तुमच्या घराचे सरंक्षण करण्यासाठी होम इन्श्युरन्स सहाय्यक ठरतो.

होम इन्श्युरन्स अंतर्गत कशाला कव्हर मिळते?

स्ट्रक्चर साठी कव्हरेज – बेसिक होम इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये तुमच्या घराच्या स्ट्रक्चरला मानवी किंवा नैसर्गिक आपत्ती जसे की, भूकंप, महापूर, वीज, आग इ. पासून कव्हर केले जाते.

सामग्री साठी कव्हरेज – इन्श्युरन्स प्लॅननुसार पॉलिसीमध्ये तुमच्या घराच्या सामग्रीला कव्हर केले जाते. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा म्हणजेच फ्रिज, टीव्ही, एसी, रेफ्रिजरेटर्स इ. उपकरणांचा समावेश होतो. यामध्ये पोर्टेबल उपकरणे, फर्निचर आणि फिक्स्चर यांचा देखील समावेश होतो. तुम्ही ज्वेलरी, कलात्मक साहित्य, दुर्मिळ वस्तू यांना देखील स्वतंत्रपणे कव्हर करू शकता.

मूलभूत कव्हरेजशिवाय, इन्श्युरन्स कंपन्या विविध ॲड-ऑन्स ऑफर करतात जे तुम्हाला कव्हरेज वाढविण्यास मदत करू शकतात.

सार्वजनिक दायित्वासापेक्ष कव्हरेज – जर तुमच्या घरातील अपघातामुळे थर्ड पार्टीला दुखापत झाल्यास किंवा थर्ड पार्टीच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास उद्भवणाऱ्या थर्ड पार्टी दायित्वासाठी ॲड-ऑन द्वारे कव्हर केले जाईल.

चला आपण सोप्या उदाहरणासह समजावून घेऊ, समजा श्री. ‘अ’ आणि श्री. ‘ब’ एकमेकांचे शेजारी आहेत. श्री. ‘अ’ हे त्यांच्या घराचे नुतनीकरण करीत आहे. आणि दुरुस्तीच्या कामामुळे श्री. ‘ब’ यांच्या घराचे नुकसान व हानी होते. जर श्री. ‘अ’ यांच्याकडे हे ॲड-ऑन असल्यास त्यांचे दायित्व या अंतर्गत कव्हर केले जाते.

पर्यायी निवासासाठी भरपाई – जर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे घर निवासयोग्य नसेल आणि यामुळे तुम्हाला पर्यायी निवासाच्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागत असल्यास वाहतूक आणि पॅकिंगचा खर्च कव्हर केला जातो.

भाडे नुकसान – जर आकस्मिक घटनांमुळे तुमच्या भाडेकरुला प्रॉपर्टीमधून बाहेर पडावे लागल्यास ॲड-ऑन मुळे तुम्हाला भाडे नुकसानासाठी भरपाई प्रदान केली जाईल.

की आणि लॉक रिप्लेसमेंट कव्हर – जर तुमच्या घराची (की) चावी चोरीला गेल्यास त्याच्या दुरुस्ती साठी आवश्यक असलेल्या खर्चासाठी कव्हर केले जाईल.

दहशतवाद कव्हर – हे पर्यायी कव्हर तुम्हाला दहशतवादी हल्ल्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसानापासून संरक्षित करेल

वर नमूद केलेल्या ॲड-ऑन्सव्यतिरिक्त, काही इन्श्युरर वॉलेट कव्हरचे नुकसान, एटीएम विद्ड्रॉल रॉबरी कव्हर, कर्मचारी भरपाई कव्हर इ. देखील प्रदान करतात. तुम्ही नाममात्र प्रीमियमच्या बदल्यात तुमच्या विशिष्ट आवश्यकतेनुसार ॲड-ऑन निवडू शकता.

होम इन्श्युरन्स पॉलिसी कोण खरेदी करू शकतो? जर तुम्ही घर मालक असाल तर तुम्ही होम इन्श्युरन्स खरेदी करू शकता. जर तुम्ही भाडोत्री घरात राहत असल्यास तुमच्या सामानासाठी होम इन्श्युरन्स खरेदी करू शकता. संपत्तीची मालकी असलेल्या संस्था देखील होम इन्श्युरन्स कव्हरेज प्राप्त करू शकतात.
होम इन्श्युरन्स पॉलिसी खरेदीपूर्वी विचाराधीन घटक- आज बहुतांश इन्श्युरर्स होम इन्श्युरन्स पॉलिसी ऑफर करतात. सर्वप्रथम तुमच्या गरजांचे मूल्यांकन करणे आणि तुमच्या आवश्यकतेच्या नुसार योग्य प्लॅनची निवड करणे अत्यंत उपयुक्त ठरते. तुम्ही निवडलेल्या ॲड-ऑन्ससह तुमच्या कव्हरची व्याप्ती वाढवू शकता. इन्श्युरर द्वारे ऑफर करण्यात येणाऱ्या कव्हर बाबत पूर्णपणे स्पष्टता येण्यासाठी काळजीपूर्वक अटी व शर्ती वाचणे आवश्यक ठरते. सुलभ आणि त्रासरहित क्लेम सेटलमेंट करणाऱ्या इन्श्युरर्सची निवड करण्याच्या सल्ला दिला जातो. यामुळे कोणत्याही आकस्मिक घटनेच्या स्थितीत तुम्हाला त्रासमुक्त क्लेम सेटलमेंटचा अनुभव मिळण्याची सुनिश्चिती प्राप्त होते.

मला आशा आहे की, या लेखाद्वारे तुम्हाला होम इन्श्युन्सचे विविध पैलू समजावून घेण्यासाठी निश्चितच मदत मिळेल. याद्वारे तुम्हाला तुमच्या मौल्यवान घराचे संरक्षणासाठी पॉलिसीची निवड करण्यासाठी माहितीपूर्ण निर्णय घेता येईल. आता तुम्हाला निश्चितच होम इन्श्युरन्सचे महत्व समजले असेल. तुमच्या गरजांचे मूल्यमापन करण्याची आणि योग्य कव्हरेजचा विचार करण्याची विनंती करतो. नेहमी लक्षात ठेवायला हवं की, आकस्मिक घटनांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपेक्षा तुमच्या इन्श्युरन्सची किंमत नेहमीच कमी असते.

आदित्य शर्मा,
मुख्य वितरण अधिकारी – रिटेल सेल्स,
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स


Back to top button
Don`t copy text!