‘जीनियस प्रोफेशनल्स’ नोकरी मिळवून देण्यात अग्रेसर प्लेसमेंट संस्था : सौ.सईद शाह परवीज निदा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२१ । पुणे । जीनियस प्रोफेशनल्स ही भारतातील अत्यंत विश्‍वसनीय प्रशिक्षण व प्लेसमेंट संस्था म्हणून प्रचलित असून मागील काही वर्षात अनेक उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यात अग्रेसर असल्याचे कौतुकास्पद वाक्य मोलेदिना हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्या सौ. सईद शाह परवीज निदा यांनी काढले. येथील जीनियस प्रोफेशनल्सच्या मुख्य कार्यालयास त्यांनी भेट दिली तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट सेवेचे कौतुक केले त्यावेळी त्या बोलत होत्या.

कोरोना महामारीमुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली. अशा प्रतिकूल परिस्थितीत जीनियस टीमने अत्यंत प्रामाणिकपणे काम करत लोकांना विविध क्षेत्रात नोकर्‍या उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच विविध प्रशिक्षण देवून स्वतःचे करिअर बनवण्यात मोठा हातभार लावला आहे.

जीनियसचे सीईओ फिरोज शेख यांनी मेकॅनिकल इंजिनिअर व एमबीए पदवी प्राप्त केली असून आयएसओचे ऑडिटर सुद्धा आहेत. त्यांनी भारतात व परदेशात बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम केले आहे. ते स्वतः महाराष्ट्रातील विविध शाळा, कॉलेज व संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत करिअर मार्गदर्शन करतात.

‘जिनियस’चे मुख्य कार्यालय कात्रज पुणे येथे असून कोल्हापूर येथे शाखा आहे. लवकरच दिल्ली व फलटण (जि. सातारा) येथे नवीन शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे फिरोज शेख यांनी सांगितले.

जीनियसचे सीईओ फिरोज शेख हे मूळचे फलटण तालुक्यातील सोनवडी बु॥ येथील असून आपल्या तालुक्यातील युवक युवतींना तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरीता फलटण येथे नवीन शाखा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी मान्यवरांचे स्वागत सीईओ शेख यांनी स्वागत केले.


Back to top button
Don`t copy text!