लोणी येथील पिढीतांचे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन


 

स्थैर्य, औंध, दि. ०८ : लोणी ता.खटाव येथील जमीन गट क्रमांक 687मध्ये ग्रामपंचायत व जाधव वस्ती येथील नागरिकांनी बेकायदेशीर पणे अतिक्रमण करुन त्रास दिल्याने गुरुवार दिनांक दहा रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा लोणी येथील रहिवासी चंद्रकांत गुरव व कूष्णत गुरव यांनी एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी, महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार लोणी येथील गट नंबर 687  आम्ही चंद्रकांत शंकर गुरव व कूष्णत चंद्रकांत गुरव हे कुळ वहिवाटदार आहोत मात्र याठिकाणी आम्हास धमक्या देऊन आमच्या जमिनीतून जबरदस्तीने जाधव वस्ती येथील रहिवाशांनी मुरूम टाकून रस्ता बनविला आहे. याबाबतचा नकाशा पाहिला असता तसा कोणताही रस्ता त्यामध्ये दाखविलेला नाही  तरीही जबरदस्ती करून रस्ता बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अगोदर ही या रस्त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी ही शासकीय स्तरावर चौकशीचे आदेश दिले होते.मात्र याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  सकाळी अकरा वाजता आत्मदहन करणार असल्याची माहिती कूष्णत गुरव यांनी दिली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!