
दैनिक स्थैर्य । 8 एप्रिल 2025। फलटण । श्रीरामनवमीनिमित्त कसबा पेठ (ब्राम्हण गल्ली) येथील दादा महाराज मठामध्ये रामकृष्ण महिला भजनी मंडळाच्यावतीने गीत रामायणाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध तबलावादक व मंडळाचे मार्गदर्शक अनिकेत देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी तबला वादनाची उत्कृष्ट साथ प्रणव आवटे तर हार्मोनियमसाठी अनिकेत देशपांडे यांची साथ लाभली. श्री सद्गुरु दादा महाराज सेवा प्रतिष्ठान, फलटण यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी संधी उपलब्ध करुन दिली.
कार्यक्रमाचे नियोजन सौ. रेवती गोसावी, सारिका गुजर, रजनी लांबोर, भाग्यश्री क्षीरसागर, मनीषा इनामदार, अंजली कालगावकर, वंदना ढाले, लीना ताथवडकर, साक्षी कुलकर्णी, वंदना जोशी, मनीषा निंबाळकर, दिपाली निंबाळकर, शिवानी चिटणीस, सीमा तगारे यांनी केले.