कोळकी येथील कु. गौरी स्वामीची पिंपरी – चिंचवड महापालिकेत अभियंता पदी निवड


दैनिक स्थैर्य | दि. 02 डिसेंबर 2023 | कोळकी | येथील कु. गौरी विवेक स्वामी हिची पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये कनिष्ठ स्थापत्य अभियंता म्हणून निवड झालेली आहे.

कु. गौरीचे प्राथमिक शिक्षण हे फलटण येथील कमला निंबकर बालभवन येथे झाले तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे मुधोजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे संपन्न झाले. त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अवसरी येथे अभियांत्रिकी शिक्षण घेतले. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्याने स्पर्धा परीक्षा देत असताना तिची पिंपरी – चिंचवड महानगरपालिका येथे कनिष्ठ स्थापत्य अभियंता पदी निवड झाली आहे.

या परीक्षा देत असताना कु. गौरीला आई, वडील व गुरुजनांचे मार्गदर्शन लाभले. कु. गौरीचे वडील विवेक स्वामी हे शिक्षक आहेत. त्यामुळे आपल्या पाल्याला उत्तम शिक्षण देत असताना कु. गौरीला पहिल्यापासून नेहमीच तिच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यात आले आहे; त्यामुळेच ती आज यशाच्या शिखरावर पोहचली आहे.


Back to top button
Don`t copy text!