
स्थैर्य, फलटण, दि. १ सप्टेंबर : गणेशोत्सवाचे औचित्य साधून, इंडियन डेंटल असोसिएशनच्या (आयडीए) बारामती-फलटण शाखेच्या वतीने नागरिकांसाठी ‘गौरी-गणपती सजावट’ या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरातील आरास सादर करून आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील सुंदर आणि सुबक गौरी-गणपती सजावटीचा एक फोटो किंवा एक छोटी व्हिडिओ रील तयार करायची आहे. ही तयार केलेली प्रवेशिका आयोजकांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवायची आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी:
- आपल्या घरातील गौरी-गणपती सजावटीचा फोटो किंवा व्हिडिओ रील तयार करावी.
- तयार केलेली प्रवेशिका दि. ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत खालील क्रमांकावर व्हॉट्सॲप करावी.
- संपर्क क्रमांक :
- डॉ. तेजस्विनी देशपांडे – ९८९०६००९९५
- डॉ. नेहा दोशी – ९५०३६७०९८७
सर्व प्रवेशिकांमधून एका लकी विजेत्याची निवड केली जाणार असून, त्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात येईल. अधिकाधिक नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपला सणाचा आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.