दैनिक स्थैर्य | दि. २५ जुलै २०२४ | सातारा |
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरण वेगाने भरत आहे. धरणात आज दि. २५ जुलै २०२४ रोजी सकाळी ८ वाजता एकूण ७५.२६ टीएमसी म्हणजे ७१.५१ % पाणीसाठा झाला आहे. धरणात ७५००० क्सुसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज सायंकाळी ४.०० वाजता धरणाचे वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उचलून सांडव्यावरून १०००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. पाऊस वाढला तर त्यामध्ये वाढ करणेत येईल, असे धरण प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे कोयना नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या धरणाच्या पायथा वीज गृहामधून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.