मायणीच्या यात्रेत गॅसच्या तुटवड्याने मंदीचे सावट


स्थैर्य, 22 मार्च, सातारा : मायणी येथील सद्‌गुरू श्री यशवंतबाबांची ऐन यात्राकाळात घरगुती व व्यावसायिक गॅसची मोठी टंचाई निर्माण आहे. त्यामुळे ऐन यात्राकाळात हॉटेल व्यावसायिक, खानावळी, नाष्टा सेंटर व चहाच्या टपरीधारकांनी गॅसला पर्याय म्हणून लोखंडी चुलीचा वापर मोठ्या प्रमाणात केला, तर घरगुती गॅसचा वापर व्यवसायासाठी होत असल्याने गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे, तर गॅस इंधनाच्या कमतरतेमुळे चहापान, हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून, यंदा यात्रेवर मंदीचे सावट जाणवले.
मायणीच्या यात्रेतील जिलेबी, साखरेच्या गाठी, भजी, शेव व मेवा या पदार्थांना जास्त मागणी असते. यात्राकाळात येणारे दुकान व्यावसायिक आपल्या सोबतच गॅसच्या टाक्या घेऊन आपला व्यवसाय यात्रेत थाटतात. मात्ररशिया-युक्रेन युद्धामुळे व्यावसायिक व घरगुती गॅसचा पुरवठा कमी झाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक, खानावळ चालक, नाष्टा सेंटर व चहापान टपरीधारक अडचणीत आले. यात्रेत ग्राहकांच्या मागणीनुसार पटकन व गरम पदार्थ बनवून देण्यात दुकानदारांना शक्य झाले नाही.
ग्रामदैवताच्या यात्रेदरम्यान मिठाई विक्रेत्यांनी दरवाढ केल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. दर वर्षी यात्रेत मोठ्या प्रमाणावर मिठाईची विक्री होत असते. यंदा मात्र गॅसच्या तुटवड्याचे कारण देत विक्रेत्यांनी मिठाईचे दर वाढवले आहेत. परिणामी सर्वसामान्य भाविकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. काही ठिकाणी ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये किरकोळ वादही झाल्याचे दिसून आले.
यात्रेत लोखंडी चुलीवरचा जाळ व वाऱ्यामुळे इच्छा दुकानात ग्राहक असूनही हवी तशी सेवा ग्राहकांनी देता आली नाही. ज्या हॉटेल मालकाकडे गॅस आहे. अशाच दुकानात जाणे ग्राहकांनी पसंत केले, तर ज्यांच्याकडे लोखंडीचूलअसेल त्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. त्यामुळे अशा मालकांना धंद्यात तुटीला सामोरे जावे लागले. त्यामुळे गावोगावच्या यात्रांवरही गॅस तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यात्रांवर मंदीचे सावट आले असून, चलनाचे दळणवळण झाले नाही.
युद्धजन्य परिस्थितीमुळे हॉटेल, रेस्टॉरंटस् आणि मेस व्यावसायिकांवर गॅसअभावी चूल पेटवण्याची किंवा हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आली असून, घरगुती गॅस सिलिंडरच्यानाष्टा सेंटरमधील पदार्थांना
मागणी असूनही ग्राहकाला पटकन पदार्थ पटकन तयार करून देता आले नाहीत. चुलीवरच्या जेवणाला मोठ्या हॉटेलमध्ये मागणी असते मात्र छोट्या हॉटेलमध्ये ग्राहकाला पटकन ऑर्डर हवी असते. गॅस तुटवड्यामुळे यात्रेत दोन दिवसांत धंदा बंद करावा लागला.
…आरिफ बागवान, हॉटेल व्यावसायिक.

Back to top button
Don`t copy text!