‘संगिनी फोरम’कडून गारवा शॉपिंग व फूड फेस्टिव्हलचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. २३ जुलै २०२४ | फलटण |
खास श्रावण महिन्यानिमित्त व नागपंचमीनिमित्त संगिनी फोरम फलटणमार्फत महाराजा मंगल कार्यालय येथे रविवार, दि. २८ जुलै रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत ‘गारवा शॉपिंग व फूड फेस्टिव्हल’चे आयोजन केल्याचे संगिनी फोरमच्या अध्यक्षा अपर्णा जैन यांनी सांगितले.

या फेस्टिव्हलमध्ये महिलांकरिता विविध वस्तू तसेच खास खवय्यांसाठी विविध पदार्थांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.

फेस्टिव्हलचे उद्घाटन जैन सोशल ग्रुपचे केंद्रीय पदाधिकार्‍यांच्या हस्ते होणार असून हा फेस्टिव्हल सर्वांसाठी खुला असल्याचे अपर्णा जैन यांनी सांगितले.

सर्व महिला तसेच पुरूष, अबालवृद्ध यांनी महाराजा मंगल कार्यालय येथे रविवार, दि. २८ जुलै रोजी गारवा फेस्टिव्हलला भेट द्यावी, असे संगिनी फोरमतर्फे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!