दैनिक स्थैर्य | दि. 23 डिसेंबर 2024 | फलटण | महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय फलटण मधील चतुर्थ वर्षातील उद्यानदुत नाईकबोमवाडी येथे मल्चिंग पद्धतीवर प्रात्यक्षिक दिले.
उद्यानदुत ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत केलेल्या प्रात्यक्षिकामध्ये मल्चिंग पद्धत वापरून पाण्याचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याबाबत माहिती दिली.
मल्चिंग पद्धत मुळे पाण्याची बचत होते, खतांचा योग्य वापर करता येतो, उत्पादनात वाढ होते,पिकांनुसार खतवाटप करता येते, गावाता वरती नियंत्रण करता येते असे बरेच फायदे उद्यानदूत शेतकऱ्यांना सांगितले.
यासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. डी.निंबाळकर व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. व्ही. लेंभे व डॉ. ए.आर. पाटील, कार्यक्रम समन्वयक प्रा. ए. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान दुत पवार प्रतिक, कोरडे रोहन, माने प्रथमेश, साबळे प्रथमेश, दारफाळे प्रज्वल यांनी हे प्रात्यक्षिक पार पाडले आहे.