गणपतराव देशमुख यांना यंदाचा आबासाहेब वीर पुरस्कार तर प्रदीप लोखंडे प्रेरणा पुरस्काराचे मानकरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, भुईंज, दि. ६: सांगोला (जि. सोलापूर) तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री भारतीय कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांना किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने यंदाचा ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ आणि रूरल फोंडशनचे प्रदिप लोखंडे यांना पाचवा ‘आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुरस्कार वितरण सोहळा होणार नसून पुरस्काराथींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानपुर्वक हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली.

मदन भोसले म्हणाले, की कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ गेल्या तेवीस वर्षापासून ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे यंदाचे चोबीसावे वर्ष आहे. एक लाख रूपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात समाजहिताचे कार्य अखंडपणे करित युवा पिढीला प्रेरक ठरणाऱ्या तसेच जुन्या पिढीबरोबरच नव्या पिढीचाही सन्मान व्हावा या उदेशाने ‘आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष असून एक्कावन्न हजार रूपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

साधी राहणीमान, उच्च विचारसरणी वब पेशाने वकिल असणाऱ्या माजी मंत्री गणपतराव देशमुख यांनी लोकशाही प्रक्रीयेमधुन तब्बल ९११ वेळा विधानसभा निवडणुका जिंकुन एक आगळा वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. शेतकरी कामगार पक्षाची पताका हाती घेऊन तब्बल ५४ वर्ष सांगोला तालुक्याचे प्रतिनिधीत्व करीत असताना दुष्काळ, पाणी, शेती, बीज, महागाई, रोजगार हमी योजना, कापूस एकाधिकार योजना, शेती मालाचे भाव आदी प्रश्नांवर त्यांनी राज्याला दिशा देण्याचे महान कार्य केले आहे. १९७८ मध्ये पुलोद सरकारमध्ये कृषी मंत्री तर १९९९ मध्ये पणन मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम आजही सर्वांच्या स्मरणात आहे. दांडगा जनसंपर्क व प्रश्न सोडविण्याची धमक यातूनच त्यांचे नेतृत्व उदयास आले. त्यांनी दोन सुतगिरण्या, शिक्षण संस्था उभारून सर्वसामान्य शेतकरी, महिला व तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्याप्रती केलेल्या कार्याचा उचित गोरव व्हावा, या भावनेतुन त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना किसन वीर व्यवस्थापनास मनस्वी आनंद होत असल्याचे मदनदादा भोसले यांनी यावेळी सांगितले.

प्रदिप लोखंडे कॉमर्स शाखेचे पदवीधर असुन त्यांनी महाराष्ट्रासह भारताच्या ग्रामीण भागात ग्रंथालयाचे जाळे निर्माण करून एक आगळा वेगळा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला आहे. ग्रामीण भागातील मुले संगणक साक्षर व्हावीत यासाठी लोखंडे यांनी २८ हजार कॉम्प्युटर शाळांना पुरविले आहेत. ग्रामीण भागाची प्रगती व्हावी यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न बाखण्याजोगे आहेत. ग्यानकीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात ३ हजार ९१0 ग्रंथालय उभारली एवढ्यावर न थांबता त्यांनी अन्य ७ राज्यांमध्ये ९ लाख ४0 हजार पुस्तके ग्रामीण भागातील ग्रंथालयांना पुरविण्यात आलेली आहेत. प्रदिप लोखंडे यांनी वैयक्तिक भारतातील असंख्य गावांना भेटी देत तेथील लोकसंख्या, बाजारपेठ, शेक्षणिक पद्धती, ग्राहकांच्या आवडी-निवडी यांचे गुणात्मक विश्लेषण केले आहे. नाटके, ललित लेख संग्रह यावर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. मार्केटींग ब सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल अनेक नामांकित पुरस्कारांनी गोरविण्यात आलेले आहे.

आजपर्यंत प्रा. ग. प्र. प्रधान, बाळासाहेब भारदे, डॉ. आप्पासाहेब पवार, भाऊसाहेब थोरात, ना. धों. महानोर, मधुकरराव चोधरी, पी. डी. पाटील, डॉ. मोहन धारिया, डॉ. निर्मलाताई देशपांडे, क्रांतिवीर डॉ. नागनाथ नायकवडी, डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील, प्राचार्य पी. बी. पाटील, अँड. रावसाहेब शिंदे, बाळासाहेब विखे-पाटील, प्रतापराव भोसले, कल्लाप्पाण्णा आवाडे, डॉ. पतंगराव कदम, न्यायमुर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, भि. दा. भिलारे गुरूजी, शंकरराव कोल्हे, विनायकराव पाटील, बी. जे. खताळ या बावीस व्यक्ती आणि राजर्षि शाहू ट्रस्ट या संस्थेस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर पहिल्या वर्षी युवा उद्योजक आणि बीव्हीजी इंडियाचे संस्थापक हणमंतराव गायकवाड यांना वब हिवरे बाजारचा सर्वांगिण विकास करणारे पोपटराव पवार यांना दुसऱ्या तर सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलासराव शिंदे यांना तिसरा, चोथ्या वर्षी हा पुरस्कार गणेश हिंगमिरे यांना आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यंदाच्या पुरस्कारारथींची निवड करण्यासाठी प्रा. संभाजीराव पाटणे, प्रा. वसंतराव जगताप, अनिल जोशी, उपराकार लक्ष्मण माने, प्रल्हादराव चव्हाण, प्रा. रमेश डुबल आणि प्रताप देशमुख यांची समिती गठीत करण्यात आलेली होती. या समितीने यंदाच्या चोबीसाव्या पुरस्कारासाठी गणपतराव देशमुरत्र यांच्या नावाची आणि पाचव्या प्रेरणा पुरस्कारासाठी प्रदिप लोखंडे यांनी एकमताने केलेली शिफारस संचालक मंडळाच्या बेठकीतही एकमताने स्विकारण्यात आल्याचेही भोसले यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे दोन्ही पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम होणार नसून पुरस्कारा्थींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानपुर्वक हे पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याचे यावेळी मदन भोसले यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!