उपळवे येथे सुमारे पाच लाखांची गांजाची झाडे जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । फलटण । फलटण येथे गावच्या हद्दीमध्ये तरडफ रस्त्यावरील माळ शिवारात पाच लाख २५ हजार रुपये किंमतीची सुमारे तेरा किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली.

याप्रकरणी पिता – पूत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला. हिंदुराव दादू लंबाते (वय ६०) व सागर हिंदुराव लंबाते (वय २५) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.

उपळवे गावातील तरडफ रस्त्यालगत माळ नावाच्या शिवारात हिंदुराव दादू लंबाते यांच्या मालकीच्या गट नंबर ८४६ मध्ये गांजाची झाडे असल्याची माहिती पोलसांना मिळाली होती.

या महितीवरून पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता तीन ते आठ फूट उंचीची १३ किलो वजनाची गांजाची झाडे आढळून आली.

याप्रकरणी पोलिसांनी हिंदुराव दादू लंबाते व सागर लंबाते या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे यांनी फिर्याद दिली.

या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस नाईक काशीद, जगदाळे, पोलिस काँन्स्टेबल कुंभार, जगदाळे, नायब तहसीलदार एस.एस.सावंत, कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय राऊत यांचा सहभाग होता. गुन्ह्याचा पुढील आधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस. ए. धोंगडे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!