
दैनिक स्थैर्य । 16 मे 2025। फलटण । गिरवी, ता. फलटण येथील अनुराधा अनिल कदम (वय 41) यांच्या गळ्यातील 13 ग्रँम 80 मिली वजनाचे 1 लाख रूपये किंमतीचे सोन्याची चेन मंगळवार, दि.13 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास फलटण एस.टी.स्टँण्डमध्ये फलटण- पुसेगाव एसटीत चढत असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद अनुराधा कदम यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात केली. अधिक तपास महिला पोलीस हवालदार माधवी बोडके करत आहेत.