फलटणमध्ये अ‍ॅल्युमिनियमची तार चोरणारी टोळी जेरबंद

4 जणांना अटक; 10 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


दैनिक स्थैर्य । 15 जुलै 2025 । फलटण । फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकांनी टॉवरच्या अ‍ॅल्युमिनियमची तार चोरणार्‍या टोळीला जेरबंद करत 10 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फलटण तालुक्यामधून शिक्रापूर ते कर्नाटक अशी इलेक्ट्रीक टॉवर लाईनचे काम सुरू आहे.  त्याठिकाणी याअगोदर 2 वेळा टॉवरच्या अ‍ॅल्युमिनियमच्या तार चोरीचा प्रयत्न झाला होता.

त्याअनुषंगाने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांना कारवाईचा आदेश दिला होता.

त्यांच्या आदेशानुसार फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या संयुक्त पथकाने गोपनीय माहिती काढत असताना हा गुन्हा संशयित सचिन संभाजी जाधव, रा. राजाळे, ता. फलटण व त्यांचे इतर साथीदारांनी केल्याची गोपनीय माहिती मिळाली.

त्यानुसार संशयित आरोपी धर्मराज बाळू जाधव, रा. रांजणी. पो. मार्डी, ता. माण, जि. सातारा, सुरज बिभिषन बेलदार, रा. सरडे, ता. फलटण, जि. सातारा, सागर संभाजी जाधव, रा. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा, रजत अंकुश मदने, रा. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा यांना शिताफीने पकडून अधिक चौकशी केल्यावर त्यांनी इतर फरारी आरोपी निनाद तानाजी जाधव, रा. पिंपरद, ता. फलटण, सचिन संभाजी जाधव, ऋषीकेश सोमनाथ मदने, रा. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा, दिपक गोंविदा पाटील, अक्षय गोंविदा पाटील, रा. चाकण पुणे या संशयितांनी व इतर अनोळखी जणांनी मिळून या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार अटक केली. त्यांचेकडून 10 लाख 13 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांकडून  फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील याअगोदरचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

संशयित आरोपी सचिन संभाजी जाधव, दिपक पाटील, अक्षय पाटील हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा शोध पोलीस घेत असून ते सापडल्यानंतर त्यांच्याकडूनही अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

ही  कामगिरी  पोलीस अधीक्षक, तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक, वैशाली कडुकर,  उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी.बी, बदने, पोलीस हवालदार नितिन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस, तुषार नलवडे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्य पोलीस फौजदार अतिश घाडगे, पोलिस हवादार सपकाळ, जगधने, कापरे, पोलीस नाईक पवार, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश चव्हाण यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!