दैनिक स्थैर्य । दि. 05 ऑक्टोबर 2021 । फलटण । फलटण शहरातील गजानन चौक येथील नुतनीकरणासाठी काढण्यात आलेला महात्मा गांधी यांचा पुतळा लवकरात लवकर बसवावा या मागणीसाठी फलटण तालुका व शहर राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘गांधीगिरी’ च्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी फलटण पालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना निवेदनासोबत गुलाब पुष्प देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी बेडके, कार्याध्यक्ष अमिरभाई शेख, शहर अध्यक्ष पंकज पवार, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रितम जगदाळे, अनूसुचित जाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ दैठणकर, अल्पसंख्यांक सेलचे तालुका अध्यक्ष ताजूभाई बागवान, शहर अध्यक्ष अल्ताफ पठाण, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष दिपक शिंदे तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी शरद सोनवणे, अच्युत माने, रिंकू शिंदे, अभिजित जगताप, नितीन जाधव, अनिल खोमणे, चंद्रकांत पवार, जालिंदर गायकवाड, सोपानराव जाधव उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.