दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२२ । बारामती । बारामती तालुक्यात सर्वप्रथम मॉल संस्कृती सुरू करून यशस्वी व्यवसाय केला व ग्राहकांना गुणवत्ता व दर्जा देत गांधी कुटूंबियांनी ग्राहकाची उत्तम सेवा केल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले.
शनिवार 16 जुलै रोजी इंदापूर रस्त्यावरील अजिंक्य बझार मॉल चे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले या वेळी पवार बोलत होते
या प्रसंगी मा. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,बारामती बॅंकचे अध्यक्ष सचिन सातव, मा. नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, योगेश जगताप,राष्ट्रवादी चे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, संभाजी होळकर, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व विश्वास देवकाते आदी मान्यवर व ग्राहक उपस्तित होते. बारामतीचा चौफेर विकास होत असताना ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सुरू केलेला मॉल मुळे बारामती च्या वैभवात भर पडेल असेही पवार यांनी संगितले.
दहा हजार स्के फूट च्या भव्य दालनात किराणा,प्लास्टिक, कॉस्मेटिक, स्टील, खेळणी, कॉक्ररी, ड्रायफ्रूट्स आदी रास्त भावात ग्राहकांना मिळणार असून नेहमी प्रमाणे सण, उत्सव वेळी विविध डिसोउंट्स ऑफर असणार असल्याचे अजिंक्य बझार मॉंल च्या संचालिका धनश्री गांधी यांनी सांगितले.
मॉल सुरू झाल्यावर खरेदी करणारे पहिले तीन भाग्यवान ग्राहक व जागेचे मालक बोरावके बंधू यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. उप्स्तीतचे स्वागत इंद्रजीत गांधी, अतुल गांधी, राजकुमार गांधी व अजिंक्य गांधी यांनी केले. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले