दैनिक स्थैर्य | दि. ३ सप्टेंबर २०२३ | फलटण |
सांगवी (ता. फलटण) गावच्या हद्दीत साई हॉटेलच्या पाठीमागे उघड्यावर खेळल्या जाणार्या मटका जुगार अड्ड्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून १ हजार ७२५ रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे.
या प्रकरणी निलेश लालासो जगताप (वय ३४, रा. सांगवी, ता. बारामती, जि. पुणे) व बापू पांडुरंग वाघ (रा. सांगवी, ता. फलटण) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास पोलीस हवालदार ओंबासे करत आहेत.