
स्थैर्य, फलटण, दि. ०६ ऑगस्ट : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या बहिणीला एक खास आणि उपयुक्त भेट देण्यासाठी अनेक जण तयारी करत आहेत. याच निमित्ताने फलटणमधील ‘गजानन सुझुकी’ या अधिकृत दालनाने ‘सुझुकी एक्सेस १२५’ या लोकप्रिय स्कूटरवर विशेष सवलत योजना जाहीर केली आहे.
या मर्यादित कालावधीच्या ऑफरअंतर्गत, ग्राहक आपल्या जुन्या दुचाकीवर ४०,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू मिळवू शकतात. ‘एक्सेस १२५’ ही स्कूटर तिच्या स्टायलिश लूक आणि उत्तम मायलेजसाठी ओळखली जाते. ग्राहकांच्या सोयीसाठी ही स्कूटर खरेदी करताना रोख आणि सुलभ फायनान्स असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
सुझुकी ब्रँडच्या विश्वासार्हतेमुळे आणि ‘गजानन सुझुकी’च्या उत्तम सेवेमुळे फलटण परिसरात ग्राहकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत असतो. या विशेष राखी ऑफरचा लाभ घेण्यासाठी जिंती नाका, फलटण येथील दालनाशी किंवा ८६०००१३९४८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.