गणेशोत्सवानिमित्त ‘गजानन सुझुकी’कडून दुचाकींवर आकर्षक ऑफर्स जाहीर

अवघ्या ४९९९ रुपयांत 'सुझुकी ॲक्सेस' घरी नेण्याची संधी; ६.९९% व्याजदरासह १००% फायनान्स उपलब्ध


स्थैर्य, फलटण, दि. 24 ऑगस्ट : आगामी गणेशोत्सवाच्या मंगलपर्वावर, ‘गजानन सुझुकी’ या सुझुकी कंपनीच्या अधिकृत वितरकाने ग्राहकांसाठी विविध आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. फलटण, सातारा आणि कोरेगाव येथील शोरूममध्ये या ऑफर्स उपलब्ध असून, सणासुदीच्या मुहूर्तावर नवीन दुचाकी खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

‘गजानन सुझुकी’ने विशेषतः ‘सुझुकी ॲक्सेस १२५’ या लोकप्रिय स्कूटरसाठी खास योजना सादर केली आहे. या योजनेअंतर्गत, ग्राहक केवळ ४,९९९ रुपये भरून नवीन ‘सुझुकी ॲक्सेस’ घरी घेऊन जाऊ शकतात. जुन्या गाडीच्या बदल्यात ४०,००० रुपयांपेक्षा अधिक एक्सचेंज व्हॅल्यू मिळवण्याची संधीही ग्राहकांना मिळणार आहे. यासोबतच, ६.९९% इतक्या कमी व्याजदरावर १००% फायनान्सची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘सुझुकी ॲक्सेस’ व्यतिरिक्त, ‘ॲव्हेनिस’, ‘बर्गमन स्ट्रीट’, ‘व्ही-स्ट्रॉम एसएक्स’ आणि ‘जिक्सर एसएफ’ यांसारख्या इतर मॉडेल्सवरही आकर्षक योजना लागू आहेत. यामध्ये ५,००० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आणि १० वर्षांपर्यंतची विस्तारित वॉरंटी यांचा समावेश आहे.

या गणेशोत्सवात आपल्या घरी नवीन सुझुकी गाडी आणून आनंदाचा क्षण साजरा करावा, असे आवाहन ‘गजानन सुझुकी’ने केले आहे. या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहक फलटण येथील जिंती नाका किंवा साताऱ्यातील पुणे-बंगळूर हायवे येथील मुख्य शोरूमला भेट देऊ शकतात.


Back to top button
Don`t copy text!