गजानन महाराज भक्त मंडळाच्यावतीने गुरुवारपासून प्रकटदिन उत्सवाचे आयोजन


 स्थैर्य, 4 फेब्रुवारी, सातारा :  गेंडामाळ येथील अर्कशाळानगरातील गजानन महाराज मंदिरात गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने पाच ते आठ फेब्रुवारी या कालावधीत प्रकटदिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
गुरुवारी (ता. ५) सकाळी सातते आठ या कालावधीत पंचामृत महाभिषेक होणार आहे. दुपारी १२ वाजता महाआरती व नामस्मरण होणार आहे. सायंकाळी सहा ते सात या कालावधीत गणेश अथर्वशीर्ष पठण होणार आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी सात ते नऊ या वेळेत महापूजा, दुपारी १२ ते साडेबारा या वेळेत महाआरती व नामस्मरण, सायंकाळी सहा ते सात या वेळेत हरिपाठ होणार आहे.
शनिवार (ता. ७) सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत शांतिपाठ, संकल्पपूर्वक नांदी श्राद्ध, पुण्याहवाचन,आचार्यवरण, आचार्यक्रम, स्थलशुद्धी, ब्रम्हादीमंडल देवता मंडल स्थापना, गजानन महाराज स्थापना, दत्तात्रय स्थापना, महाभिषेक, कापूजा, अग्निस्थापना, नवग्रह स्थापना व पूजा, दत्तमाला मंत्र हवन, रात्री भावगीतांचा कार्यक्रम होणार आहे.
रविवार (ता. ८) हा उत्सवाचा मुख्य दिवस असून, सकाळी सात वाजता महाभिषेक, त्यानंतर शांतिपाठ, देवता पूजा आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सव काळात दररोज सकाळी आणि दुपारी महाआरती मंदिरात होणार आहे.धार्मिक कार्यक्रमांत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन भक्त मंडळाचे अध्यक्ष अनिल देशपांडे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!