स्थैर्य, सातारा, दि.३: लॉकडाऊन काळात शाहू स्टेडियम येथे दुकानाचे शटर उचकटून साहित्य चोरणार्या संशयिताला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी, लॉकडाऊनमध्ये फिर्यादी यांच्या शाहुस्टेडीयमधील दुकानाचे शटर तोडुन दुकानातील अॅन्टीक पिस व इतर साहित्याची चोरी झाली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती. त्यानुसार शाहुपुरी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेने घटनास्थळी जावून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले होते. त्यानंतर या फुटेजमधील कैद झाले इसमांचा शोध घेत असताना संशयित हा आकाशवाणी झोपडपट्टी, परिसरातील असल्याची माहिती मिळाली होती.
दरम्यान, दि. 29 जानेवारी 2021 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी पेट्रोलींग करीत असताना फुटेजमधील संशयीत करंजे येथे उभा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचार्यांनी त्यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास पोलीस ठाण्यत आणुन कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला लोखंडी फ्रेम व इतर साहित्य असा 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नितीन घोडके हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, सहा.पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहा. पोलीस निरीक्षक संदिप शितोळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, पोलीस नाईक सचिन माने, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, नितीन घोडके पो.कॉ.ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते, सचिन पवार, मनोहर वाघमळे यांनी केली आहे.