स्थैर्य, सातारा, दि.२६: कुंटणखाना चालवणार्या सुत्रधार महिलेसह तिच्या साथीदारास सातारा शहर पोलिसांनी पुणे येथून गजाआड केले. सरिता बजरंग लाडी रा. तोफखाना सातारा आणि आकाश शनि कांबळे, रा. दुर्गापेठ सातारा अशी संशयितांची नावे आहेत. संबंधित महीलेस न्यायालयात हजर केले असता दि. 28 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी, संबंधित महिलेविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात कुंटणखाना चालवल्याप्रकरणी दि. 19 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संबंधित महीलेसह तिचे साथीदार फरार झाले होते. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने व आरोपींचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकास आरोपींचा कोणत्याही परिस्थीतीत शोध घेवून अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गोपनिय माहीतीदारामार्फत व तांत्रिक माहीतीच्या आधारे आरोपींचा शोध घेत होते. अशातच दि.22 रोजी डी. बी. पथकाचे उपनिरीक्षक कदम व त्यांच्या पथकास मुख्य सुत्रधार पुणे येथे लपवून राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने दि.23 रोजी पुणे येथे मुख्य सुत्रधार सरिता बजरंग लाडी हिच्या फ्लॅटवर छापा घालून तिला ताब्यात घेतले. संबंधित माहिलेस सातारा शहर पोलीस ठाण्यात आणून तिच्याकडुन गुन्ह्यातील अन्य साथीदारांची नावे निष्पन्न करुन दुसर्या दिवशी दुसरा साथीदार आकाश शनि कांबळे, रा. दुर्गापेठ सातारा यास ताब्यात घेतले. या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चारचाकी अशी दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीकसिटी वर्कर्स फेडरेशनचा खाजगीकरणा विरोधात संप
ही कारवाई पोलीस अधिक्षक अजय बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहा.पो.अधिक्षक श्रीमती आंचल दलाल सातारा विभाग व वरीष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एन.एस. कदम, सहायक फौजदार विश्वास कडव, हवालदार वाघमळे, हवालदार शेवाळे, भिसे, चव्हाण, साबळे, घाडगे, कचरे, धुमाळ, भोंग यांनी सहभाग घेतला.