तुप – खरवस देण्याचा बहाणा करुन चोरी करणारा गजाआड; लोणंद पोलीस स्टेशनची कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ मार्च २०२२ । लोणंद । गेल्या महिन्यात दिनांक ७ फेब्रुवारी रोजी लोणंद येथील एका दुकानात जाऊन दुकानदारास तुम्हाला तुप देण्यासाठी आप्पांनी पाठविले आहे. तुम्ही मला ओळखले नाही का ? असा बहाणा करुन सदर दुकानदारास बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील ३०,००० रुपये रोख रक्कम हात चलाखीने चोरल्याची घटना घडली होती. त्यानुसार मिळालेल्या माहितीवरुन लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाच्या अनुषंगाने स.पो.नि. विशाल के वायकर व पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी सीसीटिव्ही व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे यातील आरोपीचा शोध सुरु ठेवून सदर आरोपीचा शोध घेवुन आरोपी अनिल रघुनाथ बिरदवडे रा. गुणवडी, ता. बारामती जि.पुणे हा असल्याचे निष्पन्न करुन त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडुन गुन्हयातील चोरलेली रोख रक्कम ३०,००० रुपये व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

पोलीस अधिक्षक सातारा अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल के. वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार संतोष नाळे, श्रीनाथ कदम, अभिजीत धनवट, अमोल पवार, सर्जेराव सुळ, अविनाश शिंदे यांनी सदर कारवाई केली. या कारवाई बाब सहायक पोलीस निरीक्षक विशाल के. वायकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!