अलगुडेवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी गायकवाड तर व्हाईस चेअरमनपदी निकम


दैनिक स्थैर्य । दि. ३० मे २०२२ । फलटण । अलगुडेवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल दगडोबा गायकवाड तर व्हाईस चेअरमनपदी घनशाम मुगटराव निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.

अलगुडेवाडी सोसायटीची निवडणुक नुकतीच बिनविरोध संपन्न झाली. संचालक म्हणून सुभाष गायकवाड, वसंत जठार, सुभाष नेवसे, सुधीर निकम, विठ्ठलराव जाधव, बाळू सपताळे, आप्पा शेंडगे, वर्धन नेवसे, सौ.मंजू शिंदे, सौ. सिमा शिरतोडे यांची निवड झाली आहे.

अलगुडेवाडी विकास सोसायटीची स्थापना तीस वर्षापूर्वी तत्कालीन सहकार मंत्री श्रीमंत छत्रपती स्व. अभयसिंहराजे भोसले, श्रीमंत स्व. दादाराजे खर्डेकर यांच्या सहकार्याने अॅड. विजयराव नेवसे, प्रा. संपतराव शिंदे, डॉ. रमेश निकम, संजय चिटणीस यांनी केली होती.

या सोसायटीची निवडून गेल्या तीस वर्षापासून बिनविरोध होत असून या सोसायटीस सतत अडीट वर्ग अ मिळाला असून संस्थेची प्रगती मोठ्या प्रमाणात झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!