दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२३ । मुंबई । वर्षभरात शिवसेनेत झालेल्या फाटाफुटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिकमध्ये आज गद्दार दिन साजरा करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर दिन म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने स्वाभिमान दिन साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सकाळी गद्दार दिन साजरा करीत पन्नास खोके अशा घोषणा देण्यात आल्या. तर दुपारी मायको सर्कल येथील शिवसेना कार्यालयाच्या समोर युवा सेनेच्या वतीने स्वामीमान दिन साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सोनिया गांधी यांना पुष्पगुच्छ देतानाचे पोस्टर या ठिकाणी लावण्यात आले होते आणि यामुळेच आज स्वाभिमान दिन साजरा करण्यात आला.
२० जून २०२२ याच दिवशी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार व हिंदुत्व पुढे नेत ऐतिहासिक उठाव करून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष व शिवधनुष्य जो राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कडे गहाण ठेवली होतो, तो सोडवून आणत महाराष्ट्रात शिवसेना भाजपची युतीची सत्ता स्थापन केली. या निमित्ताने नाशिक शिवसेना युवासेनेच्या वतीने २० जून स्वाभिमान दिन म्हणून साजरा करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. यावेळी प्रसंगी उपजिल्हाप्रमुख सुदाम डेमसे, शाम साबळे, शशिकांत कोठुळे,अमोल सूर्यवंशी, सुवर्णाताई मटाले, मंगलाताई भास्कर, उमेश चव्हाण यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.