दैनिक स्थैर्य | दि. २९ डिसेंबर २०२३ | फलटण |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकलच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन झाल्याने गेल्या अडीच वर्षांपासून नवीन इमारतीचा रखडलेला प्रश्न लागला मार्गी लागला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल या शाळेची जुनी इमारत ही धोकादायक इमारत म्हणून घोषित झाल्यानंतर गेल्या अडीच वर्षांपासून नवीन इमारतीचा प्रश्न रखडलेला होता. या प्रश्नी ग्रामपंचायत सासकलने आवश्यक तो पुढाकार घेऊन या शाळेच्या निर्लेखनच्या बाबतीत ठोस पावले उचलली नव्हती व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकलचे मुख्याध्यापक व शिक्षक गावच्या राजकीय कारणांमुळे पुढाकार घेत नव्हते. दरम्यानच्या काळामध्ये जिल्हा परिषद सातार्याचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शाळेला भेट दिली व दोन खोल्या तातडीने मंजूर करण्याचे आदेश दिले. खोल्या मंजुरी झाल्या परंतु पुढील कायदेशीर बाबी करणेकामी ग्रामपंचायतीने कुचराईपणा केल्यामुळे जुन्या इमारतीचा पुनर्बांधणीचा प्रश्न रखडला होता. याच दरम्यान सासकल गावचे सुपुत्र विजयकुमार मुळीक उपायुक्त, पुणे यांनी शाळेला भेट देऊन तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याचा सूचना प्रशासकीय अधिकार्यांना दिल्या.
सासकल ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा प्रशासन योग्य ती कारवाई करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सासकल जनआंदोलन समितीचे उपाध्यक्ष विनायक नारायण मदने व दिनेश मुळीक यांनी सर्व प्रस्ताव पुन्हा करून निर्लेखन पत्र आणले. त्यामुळे नुकतेच गावचे उपसरपंच राजेंद्र धोंडीबा घोरपडे, माजी सरपंच हणमंत गंगाराम मुळीक, सोपानराव मुळीक, लक्ष्मण मुळीक, नंदिनी मुळीक तसेच रघुनाथ गणपत मुळीक, अजित मुळीक(पाटील), सासकल जन आंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजीराव मुळीक, विनायक मदने यांचे हस्ते भूमिपूजन झाले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर बल्लाळ, पांडुरंग निकाळजे, सुधीर ढालपे, कीर्ती निकाळजे, रूपाली शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक घोरपडे, वैशाली मुळीक, संजिवनी मुळीक, मंगेश मदने, संतोष मुळीक(पाटील), शंकर मुळीक, संतोष सुतार, भीमराव खुडे, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अशोक मिंड, ग्रामपंचायतचे कर्मचारी किसन पवार व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.